Sensex आणि Nifty म्हणजे नेमके तरी काय? या सविस्तर जाणून घेऊ

Sensex and Nifty in Marathi – रोज आपण बघत किंवा ऐकत असतो कि आज निफ्टी अमुक अमुक पॉईंट्स ने वर गेला ,खाली पडला ,सेन्सेक्स वर गेला खाली पडला ,तर हे नेमके सेन्सक्स आणि निफ्टी असते तरी काय ? हे चार्ट्स कसले असतात ? हे रोज वर खाली कशामुळे होतात? तर आपण आज बोलूया सेन्सेक्स आणि निफ्टी वर.

Sensex and Nifty in Marathi
Sensex and Nifty in Marathi

आज सर्व प्रश्नांची उत्तरे आपण समजून घेऊया. 

सोप्या भाषेत आपण समजून घेयचा म्हणलं तर असं कि, शेअर मार्केट मध्ये ५000-6000 कंपनी कार्यरत आहेत ,पण आपण रोज या कंपनीस ला ट्रॅक नाही करू शकत, पण आपल्याला जर एक साधारण अंदाज लावायचा असेल कि आज मार्केट चा स्टेटस काय आहे , मार्केट आज वर आहे की खाली ? तर हे कसे ओळखायचे ? तर यासाठी काही इंडेक्स बनवण्यात आले आहेत, ज्या मध्ये टॉप च्या काही कंपन्यांचा समावेश आहे , ज्या लार्जकॅप आहेत, आणि यांच्यावरून एक प्रेडिक्शन केलं जात कि आज ओव्हरऑल मार्केट कोणत्या दिशेला आहे , वर आहे कि खाली आहे.

सेन्सेक्स मध्ये ३० कंपनी असतात आणि निफ्टी मध्ये ५०. सेन्सेक्स मध्ये ज्या ३० कंपनी असतात यावरून आपल्याला समजत कि मार्केट आज वर आहे कि खाली, तेच जर निफ्टी चा सांगायचं झालं तर ५० कंपनी वरून आपण प्रेडिकट करू शकतो कि मार्केट ची मोव्हमेन्ट काय आहे,

सेन्सेक्स आणि निफ्टी नेहमी बरोबर च असतात का ? 

तर नाही, अस सुद्धा होऊ शकता कि सेन्सेक्स किंवा निफ्टी वर आहे पण मार्केट ऍक्च्युली मध्ये डाउन आहे।  असे सुद्धा होऊ शकत, म्हणून सेन्सेक्स आणि निफ्टी वर पूर्ण अवलंबुन राहणे योग्य नाही 

पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल कि , सेन्सेक्स किंवा निफ्टी मध्ये ज्या कंपनी आहेत त्यांची निवड कशी होते? 

कशाचा बेसिस वर होते ?

तर आपण एका उदाहरण ने समजून घेऊया.आपण सेन्सेक्स च्या बाबतीत बोलूया उदाहरण सोबत –

सेन्सेक्स मध्ये कंपनी असतात ३० पण या कंपनी सर्वात मोठ्या आहेत म्हणून नाही , तर यांचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेश जास्त आहे म्हणून यांची निवड झालीये, म्हणजे काय?

एक असते मार्केट कॅपिटलायझेशन आणि दुसरे असते फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशान 

समजा एका कंपनी च्या एका शेअर ची किंमत आहे १०० रुपये आणि कंपनी चे आहे १० शेअर, तर कंपनी ची मार्केट कॅपिटल झाले १००० रुपये , तर फक्त हे ग्राह्य धरले जात नाही , कंपनी चे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन ग्राह्य धरले जाते , म्हणजेच त्यात कंपनी चा प्रोमोटर ची हिस्सेदारी वजा केली जाते, आणि वजा केल्या नन्तर जी हिस्सेदारी पब्लिक मध्ये राहते ती ग्राह्य धरली जाते , त्यालाच फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतात.

म्हणजेच आपल्या उदाहरणात समजा १० मधले ६ शेअर जर प्रोमोटर चे असतील आणि ४ पब्लिक साठी इशू केले असतील तर ४ गुणिले १०० म्हणजेच ४०० हे कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन झाले. म्हणजेच सेन्सेक्स मध्ये ज्या ३० कंपनी आहे त्यांचा फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन हे सगळ्यात जास्ती आहे त्यांचा त्यात समावेश आहे.

आणि यामध्ये वेग वेगळ्या सेक्टर मधल्या कंपन्यांचा समावेश आहे आता तुम्हाला समजल असेल कि निफ्टी ५० मध्ये सुद्धा अशाच ५० कंपन्यांचा फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन गृहीत धरण्यात आलेला असत.  म्हणून सेंसेक्स कीव निफ्टि यांचे चार्ट पण सोबत वर खाली होत नाहीत कारण कंपन्यांची संख्या कमी जास्त आहे सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये.

अधिक वाचा – Market Cap म्हणजे काय ? जाणून घ्या सोप्या भाषेत

पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल कि या कंपन्या सेम च राहतात का कायमच्या ? कि यात बदल होतो? 

तर याच उत्तर आहे हो, यात बदल होतो।  तो म्हणजे असा कि समजा सेन्सेक्स मध्ये अशी एखादी कंपनी असेल जी चांगली परफॉर्म नाही करत आहे तर त्याचा मार्केट कॅप खाली पडणार. आणि त्याचबरोबर फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन पण कमी होणार. तर त्याठिकाणी मग दुसरी कंपनी आणली जाते जिचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन पण जास्त असेल.  हेच निफ्टी ला सुद्धा लागू होत.

सध्याच्या निफ्टि 50 आणि सेंसेक्स मध्ये कोणत्या कंपनी आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता –

  1. https://www.niftyindices.com/market-data/top-gainers-losers?Iname=NIFTY%2050
  2. https://www.bseindia.com/sensex/code/16/

अधिक वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top