Market Cap म्हणजे काय ? जाणून घ्या सोप्या भाषेत.

Market Cap म्हणजे नक्की काय? : तर एखादे कंपनीची व्हॅल्युएशन जी असते उदाहरण घेऊया की एखादी कंपनी आहे हजार करोडची तर आपल्याला त्या कंपनीला खरेदी करायची असेल तर आपल्याला हजार करून रुपये त्यांना द्यावे लागेल म्हणजेच कंपनीच्या प्रमोटरला द्यावे लागेल मग ती कंपनी आपण 1000 करोडला विकत घेऊ शकतो तर ते असते मार्केट कॅप.

Market Cap in Marathi
Market Cap

तर शेअर मार्केटच्या भाषेमध्ये हे आपण कसे कॅल्क्युलेट करतो तर त्याचे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे ते म्हणजे असे की जे काही शेअर प्राईस आहे त्याला आपण टोटल नंबर ऑफ शेअर्सने गुणाकार केल्यावर मार्केट कॅप आपल्याला मिळतो

Market Cap = Share price x Total Number of Shares

आपण एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया की समजा एखाद्या कंपनीची शेअर प्राईस जर शंभर रुपये असेल आणि त्या कंपनीचे टोटल शेअर १ करोड असतील तर त्या कंपनीचे मार्केट कॅप आपण काढूया

Market Cap = १००x १ crore 

Market Cap = १०० करोड

यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्टर असा आहे की कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स आहे हे तर सेमच राहतात पण कंपनीची जी प्राईस आहे ती मात्र वर खाली होते रोज त्यामुळे कंपनीचा मार्केट कॅप सुद्धा कमी जास्त होत असतो.

म्हणजे शेअरची किंमत वाढली की मार्केटच्या मॉडेल शेअरची किंमत कमी झाली की मार्केट कॅप कमी होईल.

Market Cap पाहणे का गरजेचे असते ??

आपण जाणून घेऊया की मार्केटचे पाहणे का गरजेचे असते तर मार्केट कॅप कंपनीची स्टॅबिलिटी किंवा कंपनीचा बिझनेस किंवा इन शॉर्ट म्हणायचं तर कंपनीची साईज मार्केट साइज हे काय आहे हे तर दर्शवतात म्हणजेच कंपनी जर लार्ज कॅप असेल तर ही कंपनी खूप वाईट स्प्रेड बिझनेस याचा आहे असा पण म्हणू शकतो मोठा ग्रुप आहे असा पण म्हणू शकतो आणि लॉंग टर्म साठी चांगले असण्याचे सुद्धा शक्यता आपण त्यावर अंदाज लावू शकतो. आणि जे इन्वेस्टर्स हे सेफ इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी लार्ज कॅप ज्याला आपण ब्लूचिप कंपनी सुद्धा म्हणतो तरी या कंपनी Large Cap मध्ये येतात आणि इन्वेस्टमेंट साठी चांगले असतात.

मग असते Small Cap कंपनी

यामध्ये कंपनी जे असतात ह्या खूप छोट्या साईजच्या असतात ज्यांचा बिजनेस हा सुद्धा कमीच स्केल ला ग्रो झालेला असतो, आणि या खूप रिस्की सुद्धा असतात जेवढ्या रिस्की कंपनीज असतात पण त्यांचे जर का बिजनेस चालली खूप चांगले तर तेवढीच ग्रोथ अपॉर्च्युनिटी सुद्धा हे बिझनेस देतात देण्याची शक्यता असते पण याचा जो रेशो असतो हा खूप कमी असतो म्हणजेच खूप कमी कंपनीज यामध्ये सक्सेसफुल होतात म्हणून याला खूप रिस्की कॅटेगरीमध्ये आपण मोजतो.

पण याचं मोजण्याचे प्रमाण काय म्हणजे कोणती लार्ज कॅप कोणती स्मॉल कॅप कोणती मेडिकॅप कंपनी आपण करायची कशी हे आपण समजून घेऊया.

तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्या १-१०० च्या टॉप कंपनीज असतात त्या लार्ज कॅप मध्ये आपण काउंट करतो उदाहरणार्थ Reliance Industries किंवा HDFC Bank

मग 101 ते 250 ज्या कंपनीत असतात त्याला आपण मिडकॅप म्हणतो उदाहरणार्थ IDFC First Bank

मग येतात Small Cap म्हणजे २५०- पुढे जसं की Campus Active Wear

शेअरची प्राईस किती जास्त आहे यावरून कंपनी किती मोठी आहे हे कळत नाही जसं की उदाहरणार्थ MRF चा SHARE हा एक लाखाच्या वरती आहे आणि तेच आयटीसी चा शेअर हा ४०० च्या जवळपास आहे तर मग मोठी कंपनी कोणती एमआरएफ का ? नाही!! जसा आत्ता सांगितल्याप्रमाणे मार्केट कॅप वरून ठरतं की कंपनी कोणती मोठी आहे किंवा कोणती छोटी तर आपल्या केसमध्ये आत्ता आयटीसी मार्केट कॅप हे पाच लाख करोडचा आहे तेच जर का आपण एमआरएफ बघितलं तर त्याचा मार्केट कॅफे 63 हजार करोडचा आहे याचा अर्थ आयटीसी ही मोठी आहे आता तुम्हाला कळालच असेल की मार्केट कॅप आपण बघितलं पाहिजे स्टॉक ची प्राईस नाही.

Read More – Share Market

2 thoughts on “Market Cap म्हणजे काय ? जाणून घ्या सोप्या भाषेत.”

  1. Pingback: 4 AI Stocks With Good Fundamentals कुठले आहेत.

  2. Pingback: Sensex आणि Nifty म्हणजे नेमके तरी काय? या सविस्तर जाणून घेऊ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top