पोस्ट ऑफिस च्या PPF स्कीम मध्ये गुंतवा महिन्याला 1100 रू आणि 15 वर्षानंतर मिळवा एवढी रक्कम

आजच्या काळात 1 लाख कमवणारा श्रीमंत नाही तर गुंतवणूक करणारा श्रीमंत आहे. पैसे कमावण्यापेक्षा गुंतवणूक करणे आजच्या घडीला खूप गरजेची आहे. आजकाल लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात यामध्ये एफडी, स्टॉक मार्केट, बॉण्ड्स ठेवी तसेच काही नवनवीन येणाऱ्या योजना. आजच्या काळात सुरक्षित गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे या साठी उत्तम पर्याय म्हणजे सरकारी बँका, पोस्ट ऑफिस आणि PPF.

Post Office 15 Year Yojana

सध्या आपल्या देशात PPF पब्लिक प्रोविडेंट फंड ही स्कीम जोरदार चालत आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी देशातील असंख्य लोक PPF मध्ये गुंतवणूक करत आहेत. PPF मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला व्याजदर मिळत असल्यामुळे बरेच लोक याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. या PPF स्कीम अंतर्गत भरलेल्या रकमेला 7.1 टक्के व्याजदर मिळतो शिवाय चक्रीयव्याजदर मिळत असल्यामुळे लोकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद आहे.

कोण कोण या स्कीम चा लाभ घेऊ शकतो?

PPF स्कीम मध्ये भारतातील 18 वर्षापुढील व्यक्ती PPF मध्ये आपले खाते उघडून गुंतवणूक करायला सुरुवात करू शकतो. तसेच 18 वयोगटाखालील व्यक्ती सुद्धा आवश्यक ती कागदपत्रे सादर करून PPF मध्ये खाते खोलून गुंतवणूक करू शकतो. या योजनेचा लाभ केवळ भारतीय व्यक्ती घेऊ शकतो.

महिन्याला 1100 रुपये गुंतवणुकीचा किती परतावा मिळणार:-

जर का तुम्ही PPF (पीपीएफ) योजनेत प्रत्येक महिन्याला 1100 रुपये जमा केले तर तुमची वार्षिक गुंतवणूक ही 13200 रुपये एवढी होईल म्हणजेच तुम्ही दरवर्षी या योजनेत 13200 रुपये ची गुंतवणूक करणार आहे. आणि या योजनेची मुदत ही 15 वर्षांची आहे. या 15 वर्षात तुम्ही एकूण गुंतवणूक ही 1,98,000 रुपये होणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला 7.1 टक्के एवढा व्याजदर लागू होणार. त्यानुसार, जर पाहिले तर, एकूण जमा रकमेवर तुम्हाला 1,60,002 एवढे व्याज मिळून एकंदरीत 3,58,002 रुपये एवढी रककम तुम्हाला मिळणार आहे.

महिन्याला 1200 रुपये गुंतवणुकीचा किती परतावा मिळणार:- 

जर तुम्ही दर वर्षी पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ (PPF) योजनेत दरमहा 1200 रुपये जमा केले तर वार्षिक रक्कम 14400 रुपये एवढी जमा होईल. म्हणजे 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत तुम्ही 216000 एवढे जमा करून त्यावर 7.1 टक्के व्याजदर मिळवून तुम्ही 15 वर्षानंतर 3,90,548 एवढे रुपये मिळवू शकता.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

 PPF योजनेचे बदललेले नियम:-

ऑक्टोबर 2024 महिन्याच्या सुरुवातीपासून पोस्ट ऑफिस च्या PPF योजनेमध्ये काही बदल झालेले आहेत त्यामध्ये PPF योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी हा भारतीय नागरिक असावा शिवाय 18 वर्षे वय पूर्ण झालेला असावा. PPF मध्ये एक व्यक्ती एकच खाते उघडू शकतो. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना पीपीएफ खात्यात 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत बचत खात्याप्रमाणेच व्याज मिळेल. जेव्हा 18 वर्षे पूर्ण होतील तेव्हापासून PPF योजनेचा व्याजदर त्यांना लागू करण्यात येईल.

Leave a comment