मेंढपाळचा मुलगा झाला IPS अधिकारी, जाणून घ्या पदांमध्ये किती असते ताकद?

Birdev Done – जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गरीब मुलेही कष्ट करून आयुष्यात यशाचे शिखर गाठू शकतात, असा आदर्श महाराष्ट्रातील गरीब मुलाने जगावर ठेवला. नुकताच आता MPSC चा निकाल लागला आहे. यामध्ये संघर्षाच्या वाटेवर चालणाऱ्या बिरदेव सिध्दाप्पा डोणे (रा. यमगे ता. कागल. जि. कोल्हापूर) याने MPSC परीक्षेत यश मिळवले आहे. त्याच्या या अपार कष्टामुळे त्याला हे यश मिळाले अन् संपूर्ण महाराष्ट्राने त्याला डोक्यावर उचलून घेतले.

Birdev Done
Birdev Done

MPSC परीक्षेत पास

बिरदेव सिध्दाप्पा डोणे हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्याघरी कोणत्याही सुविधा नसून देखील त्याने हे यश मिळवले आहे. बिरदेव लहानपणापासूनच मेंढ्या राखत होता, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आई वडील भावंडांनी दिलेल्या साथीचे आज त्याने चीज केले आहे.

अधिकारी बनण्याचे स्वप्न प्रत्येकजण बघतो, परंतु त्यासाठी प्रयत्न करतो तोच ते स्वप्न पूर्ण करतो. हे बिरदेवने जगाला दाखवून दिले. बिरदेव देशभरात 551 रँक करत MPSC परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने यापूर्वी परीक्षा दिली होती पण त्यात त्याला उपयश आले. मात्र त्याने न डगमगता पुन्हा परीक्षा दिली आणि पास तो झाला.

IPS पदाकडे कोणती ताकद असते?

भारतीय पोलिस सेवेतील महत्त्वाचे पद मानले जाते. या पदाकडे बरेच अधिकारी असतात. म्हणजेच हे पद पॉवरफुल मानले जाते. या पदावर असलेल्या सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यस्थेचे काम असते. संपूर्ण पोलिस दलाचे नेतृत्व आणि व्यवस्थापन करण्याचे अधिकार या पदाकडे असतात. अंमली पदार्थ तस्करीबाबत ठोस उपाययोजना करणे. तसेच समाजातील शांतता भंग करणाऱ्यांना वाटणीवर आणणे, शासकीय व प्रशासकीय व्यक्तीस सुरक्षा देणे. म्हणजेच पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांची सिक्युरिटी मेन्टेंट ठेवण्याची देखील जबाबदारी ही IPS अधिकाऱ्याकडे असते, त्याचबरोबर पोलिस दलात शांतता राखणे, तसेच जनतेचे प्रश्न समस्या  सोडवण्यासाठी देखील IPS पोलिस बांधील असतात. जर IPS अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा करणाऱ्या व्यक्तीची कायद्याने कानउघडणी करण्याचा देखील अधिकार त्यांना असतो. अशा पद्धतीची कामे IPS अधिकाऱ्याला करावी लागतात.  

Leave a comment