Top 12 Stock Market Rules जे तुम्हाला करोडपती बनवू शकतात !

Stock Market Rules :

१.मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल हा तोच बनतो जो long term विजन घेऊन चालतो आणि नुकसान त्याचेच होते जो खूप Short term विचार करतो.

२. आपल्याला नेहमी quality stocks पीक करता आले पाहिजे. सहसा एक unsuccessful investor उलट करत असतो ते म्हणजे quantity वर तो फोकस करतो. म्हणजेच penny stocks हे खूप स्वस्त असल्याकारणाने अन सक्सेसफुल इन्वेस्टर ते खूप जास्त प्रमाणात मिळत आहेत म्हणून बाय करतो आणि Quality stocks हे महाग असतात म्हणून तो ते विकत घेण्याचे धाडस करत नाही.

३. शेअर मार्केटमध्ये आपण फक्त प्राईस नाही बघितली पाहिजे तर कंपनीचा बिझनेस, फायनान्शिअल स्टेटमेंट कॅश फ्लो, बॅलन्स शीट, त्याचे रिझल्ट मॅनेजमेंट ची कॉमेंट्री या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.

४. शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तिथे रेग्युलर अपडेट राहणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते म्हणजेच शेअर मार्केटच्या ऑफ टाईम मध्ये सुद्धा आपण मात्र ऑन टाईम लर्निंग केली पाहिजे म्हणजेच जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण नेहमी स्वतःला अपडेट करत राहिले पाहिजे.

५. आपण सगळेच पैसे एका स्टॉक मध्ये नाही टाकले पाहिजे जास्त लालची पोटी तर आपण डावारसिफाय केलं पाहिजे म्हणजेच वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. स्टॉक्स एकाच सेक्टर मध्ये भरपूर असण्यापेक्षा भरपूर सेक्टर मधले टॉप चे स्टॉक्स असणे याला डावरसिफिकेशन म्हणतात.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

६. जसा आपण मगाशी वाचलं की शॉर्ट टर्म विचार नाही केला पाहिजे म्हणजेच लगेच गुंतवले आणि लगेच प्रॉफिट मिळाला अशी अपेक्षा पण नाही ठेवले पाहिजे आपण पेशंस ने थांबलं पाहिजे त्या शेअरमध्ये यासाठी एक उदाहरण म्हणजे आपण समजा जमिनीमध्ये गुंतवणूक केली तर आपण त्या जमिनीचा भाव रोज नाही विचारत किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर आपण त्याचा भाव रोज नाही चौकशी करत बसत तसेच ट्रीट आपण शेअर मार्केटला सुद्धा केले पाहिजे.

७. जेव्हा आपल्याला एखादा शेअर मध्ये फायदा होतो तर तो पैसा काढून आपण स्वतःच्या हाऊस माऊस साठी वापरायचा नाही तर तोच पैसा आपण पुन्हा री इन्वेस्ट करायचा मग तो आणखी चांगल्या स्टॉक मध्ये असेल किंवा आपल्याला लर्निंग साठी असेल किंवा थोडाफार रिस्क आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी.

८.आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये कधीही टिप्स वर डिपेंड नाही राहिले पाहिजे आपण स्वतःचा स्टडी ऍनालिसिस आणि लर्निंग यावर विश्वास ठेवून आणि जे मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांचे विचारसरणी आत्मसात करून आपण निर्णय घेतले पाहिजेत पण कोणाच्याही सांगण्यावरून आपण कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक नाही केली पाहिजे किंवा कोणी विकत आहे स्टॉक्स म्हणून आपण नाही विकले पाहिजे तर आपला स्टडी एनालिसिसच्या बेसेस वर आपले निर्णय असले पाहिजे.

९. स्टॉक मार्केटमध्ये लोन घेऊन गुंतवणूक करणे खूप रिस्की आहे ते आपण कधीच नाही केले पाहिजे स्वतःचे जे इनकम आहे त्यातून थोडीशी सेविंग करून मग त्या पण पैसे गुंतवले पाहिजे कारण स्टॉक मार्केट खूप रिस्की आहे काही लोक तर दाग दागिने ठेवून गुंतवणूक करतात जो पूर्ण पणे मूर्खपणा आहे, कारण stock market मध्ये volatility खूप असते , मोठे तज्ञ सुद्धा याचा अंदाज नाही लावू शकत.

१०. खराब स्टॉक्स मधून एक्झिट करणे हे एका चांगल्या गुंतवणूकदाराचे लक्षण आहे. कधी पण खराब स्टॉक मध्ये एव्हरेज करण्यामध्ये काहीच अर्थ नसतो त्यापेक्षा तो लॉस बुक करणे कधीही योग्य त्यामुळे जास्त होल्ड करणे सुद्धा चुकीचे असते चांगल्या स्टॉक मध्ये एव्हरेज करणे ही चांगली गोष्ट आहे पण वाईट स्टॉक मध्ये एव्हरेस्ट करण्यात काही अर्थ नाही. 

११. चांगले इन्वेस्टर तोच असतो जो प्रत्येक वेळी अपडेट राहतो व आपल्या पोर्टफोलिओ चा रिव्ह्यू करतो म्हणजे कुठला स्टॉक ऍड करायचा कुठला कमी करायचा कुठला थोडासा प्रॉफिट बुक करायचा ट्रिम करायचा यावर त्याची नजर असते. असे नाही की एकदा गुंतवलं विसरले.

१२. निगेटिव्ह माईंड सेट हे खूप धोक्याचे असते स्टॉक मार्केटला जे लोक सट्टा म्हणून बघतात, तर ते लोक कधी स्टॉकस ला होल्ड सुद्धा करू शकणार नाहीत पण ते जस्ट एक गॅम्बलिंग म्हणून त्यामध्ये गुंतवणूक करतात चला तुका लागला तर लागला या विचाराने आणि मग कुठल्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करून किंवा लोकांच्या सांगण्यावरून त्यांना मग लॉस होतो

तुम्हाला Rule of 72 माहीत आहेका काय असतो ? Stock Market मध्ये हा कसा फायद्याचा ठरतो ?

Leave a comment