शेअर बाजार मध्ये पोर्टफोलिओ कसा बनवतात? जाणून घ्या सविस्तर | Portfolio Meaning in Marathi

आपण नेहमीच स्टॉक मार्केटमध्ये हे ऐकले असेल पोर्टफोलिओ xyz% ने वाढला/ कमी झाला, पण आपल्याला हा प्रश्न पडत असेल की हा पोर्टफोलिओ नेमका असतो तरी काय किंवा याला बनवतात कसे ? कंपन्या कसे निवडायच्या ? कोणते सेक्टर निवडायचे? कुठले पॅरामीटर्स लक्षात घ्यायचे हे आपण बघणार आहोत.

Portfolio Meaning in Marathi
Portfolio Meaning in Marathi

१. QUANTITY

पोर्टफोलिओ मध्ये स्टॉक्स किती ठेवायचे याच्याशी काही प्रमाण ठरवलेले नाही पण आपण जर का मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहेत तर साधारणपणे कमीत कमी दोन ते तीन स्टॉक्स हे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असले पाहिजे जेनेकरून आपली रिस्क डायव्हरसीफाय होते. काही काही लोक एकच स्टॉक ठेवतात पण हे खूप रिस्की असते. जास्तीत जास्त किती स्टॉक ठेवले पाहिजे याचे काही प्रमाण नाही. 

२. Stocks Selection

आपल्याला जर एक चांगला पोर्टफोलिओ बनवायचा असेल ज्यामध्ये कमी रिस्क आणि चांगले रिटर्न्स आपल्याला पाहिजे असतील तर आपण ज्या त्या सेक्टर मधले जे टॉप लीडर्स असतात ते सर्वात आधी निवडले पाहिजे. आणि स्टॉक स्पिक करताना शक्यतो हे सुद्धा आपण बघितले पाहिजे की हे स्टॉक्स Debt फ्री असतील. व त्यांच्या रिझर्व च्या मानाने Debt खूप कमी असेल. 

३. Diversification

याचा अर्थ असा की आपण एकाच स्टॉक मध्ये किंवा खूप फोकस्ड पोर्टफोलिओ नसला पाहिजे. Diversification चा अर्थ असा नाही की भरपूर स्टॉक मध्ये गुंतवणूक केली, तर diversification चा अर्थ असा की भरपूर सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आणि त्या सेक्टर मधल्या काही निवडक कंपन्या किंवा जे आपण Point २ मध्ये बघितले तशा टॉपच्या कंपन्या निवडल्या.

उदाहरणार्थ आपण समजा IT सेक्टर मध्ये गुंतवत असो तर IT सेक्टर मधल्या टॉपच्या दोन-तीन कंपन्या आपण निवडणे खूप कमी रिस्की ठरते. मग chemical सेक्टर मध्ये गुंतवत असो तर त्यामधल्या टॉपच्या दोन-चार कंपन्या. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

४.Capital Allocation

ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला कमीत कमी रिस्क घेऊन चांगले रिटर्न्स जर का कमवायचे असतील तर आपण लॉजिकली विचार करणे खूप गरजेचे आहे याचाच अर्थ असा की एखादा शेअर आपल्याला कितीही आवडूद्या पण त्यामध्ये १०% टक्के पेक्षा जास्त गुंतवणूक आपण करायची नाही. दहा टक्के हे सुद्धा जास्तीत जास्त आहे. शक्यतो यापेक्षाही कमीच आपण एखाद्या शेअरमध्ये गुंतवले पाहिजे कारण जर का तो शेअर डाऊन ट्रेंडमध्ये गेला तर आपला पूर्ण पोर्टफोलिओ डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतो.

५. Timing/ Entry

i) याला आपण एका SIP सारखे सुद्धा मॅनेज करू शकतो ते म्हणजे असे की एखाद्या तारखेला दर महिन्याच्या, फिक्स आपण एक रक्कम नियमाने गुंतवू.

ii) पैसे साठवून एखाद्या शेअर मध्ये ऑपॉर्च्युनिटी ची वाट पाहून जसे १०-१५% शेअर डाउन आला तसे त्या शेअरमध्ये एन्ट्री. असे सुद्धा आपण करू शकतो.

६. Sector Selection

हा प्रश्न तर आपल्याला नेहमीच पडत असेल की कोणत्या सेक्टर मध्ये नेमके आपण गुंतवले पाहिजे. तर मित्रांनो वॉरंट बफेट जे इतके सक्सेसफुल इन्वेस्टर आहेत ते असे म्हणतात की “अशा व्यवसायात कधीच गुंतवू नये जो व्यवसाय तुम्हाला समजत नाही” 

पण त्यातल्या त्यात जर का म्हणायचे तर असे काही सेक्टर आहे की ज्याचा शेवट नाही. 

१.FMCG २.FINANCE ३.PHARMA ४.IT

इथे पण आपला वरती दिलेला पॉईंट २ कामी येऊ शकतो तो म्हणजे असा की जर का एखादा सेक्टरमध्ये आपल्याला नॉलेज नाहीये तर त्यातल्या टॉपच्या कंपन्या अशा ज्या DEBT FREE आहेत अशामध्ये आपण थोडीशी रिस्क घेऊ शकतो.

७. Asset Allocation

समजा आपल्याला थोडीशी जास्त रिस्क घ्यायची इच्छा असेल किंवा असा पोर्टफोलिओ की ज्यामध्ये मोठ्या कंपन्या सुद्धा असतील आणि छोट्या कंपन्या (risky stocks) तर आपण तसा ही पोर्टफोलिओ बनवू शकतो पण यासाठी रिस्क मॅनेजमेंट करणे खूप गरजेचे आहे तर ते तुम्ही खाली दिलेल्या प्रमाणे विचारात घेऊ शकता.

Small Cap : ५-१०% कॅपिटल

Mid Cap : २५-३०% कॅपिटल

Large Cap : ५०-६०% कॅपिटल

मित्रांनो आपली रिस्क घेण्याची ताकद कितीही असू द्या पण कॅपिटल टिकवणे हे ही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे छोट्या कंपन्यांमध्ये कमीत कमी गुंतवणूक आणि मोठ्या कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणे आवश्यक असते.

८. Penny Stocks

पेनि स्टॉक मध्ये आपण किती गुंतवले पाहिजे? तर पेनिस स्टॉक मध्ये आपण एकदम चिल्लर अमाऊंट जी पूर्ण शून्य झाली तरी चालेल आणि ते आपल्याला फरक पडणार नाही इतकी छोटी अमाऊंट आपण त्यामध्ये गुंतवू शकतो. कारण एक टक्क्या पेक्षाही कमी पेनि स्टॉक असे असतात जे आपला फायदा करून देतात. पण स्टडी पर्पजसाठी आपण नक्की एक एक्सपेरिमेंट म्हणून गुंतवू शकतो अगदी छोटी अमाऊंट.

९. Review

आपण जो पोर्टफोलिओ बनवणार त्यामध्ये एकदा गुंतवणूक सोडले असे नाही झाले पाहिजे, म्हणजेच आपण एका कालावधीनंतर त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस जर का गरजेचे असतील तर ते केले पाहिजे जे ग्रोथ स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये वाढ केली पाहिजे कंपनीचे रिझल्ट्स ग्रोथ याबद्दल अपडेट राहिले पाहिजे आणि आपण काय इम्प्रूमेंट करू शकतो हे सतत बघत राहिले पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top