Shenkhat Management:  कच्चे शेणखत शेतात का टाकू नये; जाणून घ्या सविस्तर माहिती

शेणखत हे सेंद्रिय शेतीसाठी वरदान समजले जाते. गाई, म्हशी, बैल यांचे शेण पूर्णतः कुजवल्यानंतर त्यातील गुणधर्मामुळे ते पिकासाठी खत म्हणून वापरता येते.  परंतु अनेकदा योग्य माहिती न मिळवताच  किंवा शेणावर योग्य ती प्रक्रिया न करता ते शेतीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांचे नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, कच्चे शेण शेतात टाकल्याने पिकाला कोणकोणते नुकसान होऊ शकते. अभ्यासपूर्ण माहितीसाठी लेख शेवटपर्यंत वाचा. Shenkhat Management

Shenkhat

खरीप हंगामातील पिकावर अळीचा प्रादुर्भाव

यावर्षी खरीप हंगामातील मक्याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. कांदा आणि मक्याच्या पिकाचे मुळ खाणारी हुमनी या कीटक अळीचा हा प्रादुर्भाव असल्याते अभ्यासकांच्या लक्षात आले. तसेच पुढील अभ्यासात असेही लक्षात आले की ज्या शेतकऱ्यांनी शेण पूर्णतः कुजल्यावर शेतात टाकले नाही त्याच शेतकऱ्यांच्या शेतात या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. Shenkhat Management

शेणखत कसे तयार करायचे?

शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत असून शेतकऱ्यांना ते शेतातच उपलब्ध होऊ शकते. जनावरांच्या गोठ्यातील शेणामध्ये जनावरांचे मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्यांचे अवशेषही असतात. जनावरांच्या गोठ्याच्या कडेला माती टाकून त्यामध्ये जनावरांचे मलमूत्र शोषून घेतल्यानंतर ती माती शेणखताच्या खड्ड्यात शेणासोबत मिश्र केली असता शेणखताची प्रत सुधारते. सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतात ०.४ टक्के नत्र, ०.१५ टक्के स्फूरद आणि ०.५० टक्के पालाश असते, आपल्या देशातील उष्ण व दमट हवामानाच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होते जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. शेणखताच्या वापाराने पीक देखील चांगले येते.  Shenkhat Management

गांडूळ खत शेतीसाठी वरदान आहे

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. हे पदार्थ खाल्ल्यानंतर गांडुळाच्या शरीरातील आवश्यक असा भाग सोडून उरलेला भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकला जातो  त्यालाच गांडूळ खत असे म्हणतात. गांडुळ खत हे शेतीसाठी वरदान आहे. शेण किंवाकुजलेल्या सेंद्रिय घटकांमध्ये किमान 50 टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी  फवारल्यानंतर साधारणपणे दोन ते अडीच महिन्यांत गांडूळ खत तयार होते. Shenkhat Management

पीकासाठी कोणत्याही प्रकारचे खत वापरताना मग ते सेंद्रिय असो किंवा बाजारातील केमिकलयुक्त, योग्य मार्गदर्शनाशिवाय पिकासाठी खत वापरु नये. कृषी तज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा. नाहीतर पिकावर विपरीत परिणाम होऊन नुकसान होऊ शकते. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top