BMW Mini Countryman Electric: अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये नॉनस्टॉप मुंबई ते जळगाव! BMW च्या इलेक्ट्रिक कारचा भारतात धमाका

लक्झरी कार्समध्ये लोकप्रिय BMW ही कंपनी भारतात त्याच्या नवनवीन कार लाँच करीत असते. BMW म्हणजे Bayerische Motoren Werke. ही एक जर्मन कंपनी असून चारचाकी वाहने आणि मोटरसायकल्स बनवते. या कंपनीचे जगभरात 300हून जास्त कार्सचे ब्रँड आहेत. BMW कंपनीने तीची नवीन इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केली आहे त्याबद्दल अधिक माहिती मिळवूया.

BMW Cooper Countryman Electric
BMW Mini Cooper Countryman Electric

आत्ताच काही दिवसांपुर्वी  MINI India कंपनीने आपली नवी इलेक्ट्रीक कार इंडियन मार्केटमध्ये लाँच केली आहे. ही कार Mini Cooper आणि BMW प्रमाणे लग्जरीयस आहे. जाणून घेऊया या कारची किंमत आणि फिचर्स…

भारतीय बाजारात BMW कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन

BMW या कंपनीच्या Mini Countryman कारचे ग्लोबल मार्केटमध्ये पेट्रोल व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. मात्र भारतात या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे सध्या भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलला जास्त मागणी आहे. भारत ही वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मोठी बाजारपेठ आहे.

BMW Mini Countryman कारची किंमत

इलेक्ट्रिक कार असलेल्या Mini Countryman कारची स्टार्टिंग प्राईज  54.90 लाख रुपये इतकी आहे.  इतर लग्झरीअस कार्सच्या तुलनेत ही किंमत तोडीस तोड आहे असे म्हणायला हरकत नाही.

BMW Mini Countryman चा वेग

ही कार 8.6 सेकंदात  ताशी 0 ते 100 किमी इतका स्पीड पकडते. या कारचा टॉप स्पीड ताशी 170 किमी इतका आहे. ही कार 130kW रॅपिड चार्जरने  30 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के सहज चार्ज करता येते.  सिंगल चार्जमध्ये 462Km ची रेंज मिळते असा दावा कंपनीने केला आहे. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

 Mini Countryman चे फिचर्स

Mini Cooper आणि BMW कारमध्ये समाविष्ट असलेले सर्व फिचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर मिनी कंट्रीमन इलेक्ट्रिकमध्ये  कंपनीने 66.4kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देखील दिला आहे. जो BMW iX1 प्रमाणे आहे.   Mini Countryman या कारचे इटेरियर डिझाईन अतिशय सिंपल आहे.

ज्या वाहनचालकांना BMW कंपनीच्या विविध ब्रँडच्या कार्स चालवायला आवडतात त्यांनी ही इलेक्ट्रिक कार नक्कीच ट्राय केली पाहिजे. याचा ताशी वेग आणि कमी खर्चात जास्त काळ प्रवास नक्कीच अनुभवला पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top