आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे 3000₹

राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःसाठी महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत. महिलांना आर्थिक (Financial) दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता यात संदर्भात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. लाडक्या बहिणींना या योजनेचा (Ladaki Bahin Yojana) पहिला हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात राज्यातील महिलांना या योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे. 

दीड कोटीहून अधिक महिलांनी केली नोंदणी  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी देशातील जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांनी आपली नोंदणी केली आहे. सरकारच्या या नव्या कोऱ्या योजनेमुळे महिला खुश झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने महिलांना हे गिफ्ट दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेचे दोन हप्ते एकदम महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे महिला आतुरतेने खात्यात पैसे कधी येणार यासाठी धावपळ करत आहेत. 

महिलांच्या खात्यात कधी होणार 3000 जमा? 

महिलांच्या खात्यात रक्षाबंधन दिवशी सरकार तीन हजार रुपये जमा करणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच महिलांना रक्षाबंधनाचे गिफ्ट मिळणार आहे. रक्षाबंधन दिवशी खात्यामध्ये 3 हजार येणार असल्यामुळे ज्या महिलांचे कागदपत्रे पूर्ण नाहीत किंवा बँक खाते चालू केले नाही अशा महिला धावपळ करून हे सर्व पूर्ण करत आहेत. 

योजनेच्या लाभासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत 

यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यामध्ये अपयश आले आहे. यानंतर आता राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक तीन ते चार महिन्यात होणार आहे. सर्वप्रथम मध्य प्रदेशात ही योजना सुरू करण्यात आली होती. मध्यप्रदेशाच्या धरतीवरच महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्याचबरोबर जुलै महिन्यापासून महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख फॉर्म भरण्यासाठी महिलांना देण्यात आली आहे.  

Leave a comment