शेतकऱ्यांनो कांद्याच्या दरात वाढ! पण वाढलेले दर स्थिर राहणार का? पाहा काय आहे सरकारचा प्लॅन? | कांदा बाजार भाव

Onion Rate Hike
Onion Rate Hike

कांदा बाजार भाव | बाजारात सध्या कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शेतकऱ्यांना नेहमीच रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना हसवत आहे. कांद्याच्या (Onion Rate) वाढत्या दरामुळे सामान्य नागरिकांची मात्र धांदल उडाली आहे. कांद्याच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना चांगलाच होत आहे. परंतु कांद्याच्या वाढत्या दराचे चित्र असेच पाहायला मिळेल की कांद्याच्या दरावर नियंत्रण आणले जाईल हे जाणून घेऊयात.

सरकारने केला कांदा खरेदी

कांद्याचे दर वाढल्यामुळे ते नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू केली आहे. आतापर्यंत सरकारने 71 हजार टन कांद्याची खरेदी केली आहे. तसेच कांद्याचे दर नियंत्रणात राहण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना देखील करत आहे. दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठे पाहून उचलत व फर्स्ट स्टॉप मध्ये 71 हजार टन कांदा खरेदी करून ठेवला आहे. यंदा कांदा उत्पादनात देखील घट होण्याचा अंदाज आहे. ज्याचं कारण म्हणजे तीव्र उष्णता आणि पावसामुळे किमान 20 टक्के कांद्याच्या उत्पादनात घट होऊ शकते. कमी उत्पादन हेच कांदा दरात वाढ होण्याचे पहिलं कारण असू शकते. 

किती मिळतोय कांद्याला दर? 

सध्या कांद्याला प्रति किलो 40 रुपयांचा भाव मिळत आहे. दराचे हे चक्र वाढण्याआधीच सरकार उपाययोजना करण्यात सक्षम झाले आहे. तसेच कांद्याची किरकोळ किरकोळ खरेदीला कांद्याला प्रति किलो 38.67 रुपये इतका दर मिळत आहे. परंतु सरकारच्या या उपायोजनांमुळे आगामी काळात कांद्याचे दर कमी होऊ शकतात. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार तब्बल पाच लाख टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच देशाच्या अनेक भागांत पावसामुळे देखील कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a comment