How Wife can save Your tax: भारत हा रुढी परंपरांना महत्त्व देणारा देश आहे. भारतात पुरुषप्रधान संस्कृती अनेक काळापासून अस्तित्वात आहे. त्यामुळे महिलांना वाईट वागणूक देणे, त्यांचा छळ करणे असे अनेक प्रकार येथे घडतात. हे चित्र कालांतराने बदलत जावे यासाठी भारत सरकार देखील विविध योजनांच्या माध्यमातून काम करताना दिसून येत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना विविध अधिकार देण्यात आले आहे. तसेच पत्नीच्या नावे विविध आर्थिक व्यवहार केल्यास पती त्याचे 7 लाखापर्यंतचा इनकम टॅक्स वाचवू शकेल. चला तर मग याबद्दल लेखाच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेऊया.
How Wife Can Save Your Tax
जॉईंट होमलोन अकाऊंट काढा
स्वतःचे स्वतंत्र घर असावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते, मग पती पत्नी दोघांनी मिळून होमलोन घेतल्यास करात सवलत देण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला आहे. गृहकर्जाच्या मूळ रकमेवर पतीपत्नी दोघानाही प्राप्तकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख म्हणजेच 3 लाख रुपये ट्रेक्स बेनिफिट क्लेम करु शकतात. कलम 24 अन्वये दोघांनाही व्याजावर 2-2 लाख रुपयांचे टॅक्स बेनिफिट देखील घेता येतो. या नुसार पाहता एकूण 7 लाख रुपयांचा टॅक्स बेनिफिट पत्नीच्या नावे गृहकर्ज केल्यास मिळतो. How Wife can save Your tax
पत्नीच्या नावे शैक्षणिक कर्ज मिळवा
आजही अनेक घरांमध्ये लग्न झाल्यामुळे मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. म्हणूनच ही एक सामाजिक गरज आहे असे समजत भारत सरकारने पत्नीच्या नावे शैक्षणिक कर्ज घेतल्यास पतीला त्याच्या करात सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्राप्ती कराच्या कलम 80E अंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर 8 वर्षांपर्यंत करसवलत मिळते. यामुळे अनेक विवाहित महिलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे. तसेच त्या महिलांच्या पतींना त्यांच्या करात सवलत देखील मिळणार आहे. How Wife can save Your tax
एकत्रीत आरोग्य विमा काढा
जर का तुम्ही आरोग्य विमा काढत असाल तर तो पत्नीला सोबत घेऊन काढा. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहात तर आरोग्य विमाच्या माध्यमातून तुम्ही 25 हजारापर्यंतची रक्कम वाचवू शकता सेक्शन 80Dच्या माध्यमातून सूट मिळू शकते. यामध्ये आपण मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर घेऊ शकतो. जर तुमचे वय 60 वर्षाहून अधिक आहे. तर तुम्हाला 50 हजारापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो. How Wife can save Your tax