आधुनिक शेतीच्या या प्रकारासाठी महाराष्ट्र सरकार देणार 50% अनुदान

 भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. त्यात महाराष्ट्र राज्य म्हणजे शेतीतून येणारी विविध उत्पादने निर्यात करणारा देश आहे. परंतु आता पावसाच्या लहरींमुळे आणि मातीच्या बदलत्या पोतामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन देखील विविध योजना राबवत आहे. अशाच एका आधुनिक शेतीबद्दल आज आम्ही माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया Hydroponics Farming या शेतीच्या आधुनिक प्रकाराबद्दल.

Hydroponic Farming
Hydroponic Farming

Hydroponics Farming ची संकल्पना समजून घेऊ

Hydroponics Farming ही शेती व्यवसायात क्रांती आणणारी संकल्पना आहे. मातीशिवाय रोपे वाढवण्याच्या पद्धतीला हायड्रोपोनिक शेती करणे असे म्हणतात.  वनस्पतींची मुळे पाण्याच्या द्रावणात बुडवून ठेवली जातात आणि चांगल्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये योग्य दिली जातात. पालेभाज्यांपासून ते टोमॅटोपर्यंत विविध प्रकारची शेती करताना ही पद्धत वापरता येते. परदेशात या अशा प्रकारच्या शेतीला सुरुवात झाली आहे आणि आता आपल्या भारतात देखील अनेक राज्यांमध्ये हायड्रोपोनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. hydroponic farming subsidy in india

 पाण्याच्या कमी वापराने मातीशिवाय पाईपमध्ये केली जाणारी शेती hydroponic farming ही कमी पाण्याच्या वापाराने होणार शेती आहे. कोणत्याही प्रकारच्या मातीचा वापर न करता केवळ पाईपच्या मदतीने ही शेती केली जाते. कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी देखील शेतीचा हा प्रकार अनेक देशांमध्ये आत्मसात केला गेला आहे.

Hydroponic Farming करणाऱ्या शेतकऱ्याला शासनाकडून मिळणार 50%अनुदान

भारतातील विविध राज्यांमध्ये हायड्रोपोनिक शेतीसंबंधीत माहिती समजून घेऊन शेतकऱ्यांनी शेतीची ही पद्धत आत्मसात करावी यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे असू शकते. आपल्या महाराष्ट्र सरकारने मात्र हायड्रोपोनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना 50% अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील शेतीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. इतकेच नाही तर या शेतीतून मिळणारे उत्पन्न निर्यात देखील केले जाऊ शकते. hydroponic farming subsidy in india

येथे करा अर्ज

तुम्ही देखील hydroponic farming  करण्यास इच्छूक असाल तर आजच https://www.nhb.gov.in/ या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि तुमचा ऑनलाईन अर्ज दाखल करा. hydroponic farming करण्यासाठी 50% शासकीय अनुदान मिळवा. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a comment