ट्रॅफिक पोलीस म्हटले की अनेकांना घाम फुटतो. वाहनाचे अधिकृत कागदपत्रं असून देखील कोणत्या ना कोणत्या कारणासाठी विनाकारण अनेकदा वाहनचालकांना वेठीस धरणारे टॅफिक पोलीस कोणालाच नको असतात. त्यासाठी गुगल मॅपची एक सुविधा आपल्याला नव्याने समजली आहे. त्याबद्दलच आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुम्ही देखील वाहन चालक असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये वाहन चालक असतील तर त्यांच्यापर्यंत हा आमचा लेख जरुर पोहोचवा, नक्कीच त्यांचा फायदा होईल. Traffic police location on google map
बेगळुरूच्या एक तरुणाने केली पोस्ट
8 जुलै 2024 ला बेंगळुरू येथील गुरू मंदगड्डे नावाच्या तरुणाने त्याच्या @kiraataka_2 या इन्स्टा अकाऊंटवरुन पोस्ट केली. “Just type “Police irt” on Google Maps and thank me later” असे लिहिलेली ही पोस्ट काही तासांमध्ये व्हायरल होऊ लागली. सोशल मिडियावर तर या पोस्टने हंगामा केला होता. तेव्हापासून आतापर्यंत अनेकांही ही पोस्ट रिट्विट, शेअर करुन अनेकांपर्यंत पोहोचवली आहे. Traffic police location on google map
गुगल मॅपच्या मदतीने असे मिळवा ट्रॅफिक पोलिसांचे लोकेशन
गुरू मंदगड्डे या तरुणाच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रवास करीत असाल आणि तुम्ही गुगल मॅपमध्ये Police irt असे टाईप केल्यास तुम्हाला तुमच्या लोकेशनपासून जवळच असलेल्या ट्रॅफिक पोलिसांचे 10 लोकेशन्स मिळू शकतात. त्यांच्या वापराने तुम्ही ट्रॅफिक पोलीसांच्या जाचापासून सुटण्यासाठी दुसरा एखादा मार्ग निवडू शकता. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करावे. वाहतुकीचे सर्व नियम पाळून देखील काही नागरिकांना उगीचच ट्रॅफिक पोलिसांचा त्रास सहन करावा लागतो अशांसाठी हा मार्ग अत्यंत उपयोगी ठरणारा आहे. Traffic police location on google map–