महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील शेत जमीनींच्या मोजणीचे प्रश्न गेली अनेक दिवस वादात होता. शेतकऱ्यांकडून जेव्हा जमीन मोजणीची मागणी केली जात असे तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी जमीन मोजून देत असत परंतु अपूर्ण कार्यप्रणालीमुळे जमीन मोजणीचे योग्य परिणाम अधिकाऱ्यांना मिळत नसत. त्यात अनेक त्रुटी असल्याने शेत जमीन धारक आणि इतरांमध्ये वाद विवाद होत असत. परंतु आता शेतकऱ्यांची ही चिंता मिटली आहे. कारण भूमी अभिलेख विभागामार्फत एक अशी कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे ज्याच्या वापराने अगदी एका तासात अचूक जमीन मोजणी करणे शक्य झाले आहे. चला तर मग या विकसित प्रणालीबद्दल अधिक माहिती मिळवूया. E-mojani 2.0
E Mojini Version 2
खातेदारांकडून जमीन मोजणीबाबतच्या तक्रारी येत
यापुर्वी शेत जमिन मोडणीमध्ये त्रुटी राहिल्याने वाद होत असत. मोजणीनंतर देखील नकाशा बनविण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटींमुळे हद्द वेगळी असे आणि नकाशावर वेगळीच हद्द दाखवली जात असे. त्यामुळे ऊस पिकाची मोजणी देखील अभिलेख विभागाला करता येत नसे. E-mojani 2.0
एका तासात जमिनीची मोजणी शक्य
महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख विभागाने E mojini version 2.0 ही संकणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये सॅटेलाईटच्या मदतीने रोव्हरचा वापर केला जात आहे. या प्रणालीच्या मदतीने जमीनीची मोजणी अगद 1 तासात करणे शक्य होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, शिरोळ, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा या सहा तालुक्यांमध्ये या E mojini version 2.0 प्रणालीच्या मदतीने जमीनीची ई मोजणी होत आहे. आणि त्याचे परिणाम देखील खूप चांगले आहेत. E-mojani 2.0
शेतकऱ्यांना या ई मोजणी व्हर्जन 2.0 प्रणालीचा कोणता फायदा होत आहे?
शेत जमीनीसंबंधत वाद विवाद होत असताना शेतकरी त्यांच्या जमीनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करतात. कार्यालयातील अधिकारी येऊन जमीन मोजतात परंतू या प्रक्रियेला खूप वेळ लागत असे आणि सर्वाच महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये अनेक त्रुटी देखील राहत होत्या, परंतु ई मोजणी व्हर्जन 2.0 प्रणालीच्या मदतीने कमी वेळात जमीनीची मोजणी होत असल्याने शेतकऱ्यांचे वाद विवाद मिटण्यास मदत होत आहे. अधिकाऱ्यांचा त्यामध्ये वेळ वाचत आहे.
शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान प्रणाली विकसित होत आहे. त्यासंबंधी अधिक माहीत मिळावी यासाठी आमच्या व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये सामील व्हा. E-mojani 2.0
R/s Sir/Madum,
I wish to submit online mojani application of an agricultural land. So please give me the website details on my email id .
My email id is pralhadsmc@gmail.com
Please visit nearby gov office.