आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ‘सिबील’ सक्ती नाही, थेट मुख्यमंत्र्यांनीच केलं आवाहन | Crop Loan

राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील मशागतीसाठी कंबर कसली आहे. पेरण्यांना जोरदार वेग आल्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा देखील तेवढाच गरम झाला आहे. शेती (Agriculture) करायचं म्हटलं की भांडवल हे लागतं, म्हणूनच शेतकऱ्यांना पीक कर्जाचा (Crop Loan) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याच पीक कर्जाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळणार आहे.

Crop Loan
Crop Loan

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. त्यामुळेच शासन देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. म्हणूनच बँकांनी देखील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. याच कारणास्तव बँकांनी अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना हात आखडता घेऊ नये, असे आवाहन त्यांनी बँकांना केले आहे.  

पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ची सक्ती नाही

इतकचं नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना ‘सिबिल स्कोअर’ ची करू नये असे देखील आवाहन केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळणे शक्य होणार आहे. तसेच राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य देण्यात यावे, याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्याचबरोबर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 41 हजार 286 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज मिळेल अशी शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top