यंदा मान्सूनने राज्यात लवकरच प्रवेश केला. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस चांगला राहणार असणार आहे. या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आहे. या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगामामध्ये कोकण आणि नाशिकचा पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भरड धान्याची लागवड केली जाते. मात्र भरड धान्य पेरणीसाठी एकरी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
Farmer Incentives
शेतकऱ्यांना किती मिळणार प्रोत्साहन?
भरत भरड धान्य लागवडीत पेरणीसाठी एक एकरी दहा ते बारा हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार पेलावा लागतो. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचा थोडासा हातभार लागला तर त्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळेल. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना भरडधान्य लागवड पेरणीसाठी एकरी 3 हजार रुपये प्रोत्साहन देण्यात येणार आहेत. तसेच हे प्रोत्साहन 5 एकरच्या मर्यादेपर्यंत असणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन 15 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शेतकऱ्यांना 2024-25 या आर्थिक वर्षाच्या कृषी विभागाच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, मोबाईल नंबर, आधार लिकिंग बॅक खाते, जमीन मालकीचे प्रमाणपत्र (महसूल पावती), प्रमुख, गावप्रमुख, महसूल कर्मचारी तसेच झोनल ऑफिसरद्वारे दिलेला वंशावळी, खातेदार किंवा बटाईदार शेतकऱ्यांचा स्वघोषणा फॉर्म असणे अनिवार्य आहे. तसेच शेतकरी राज्याचा कायम रहिवासी असावा. त्याचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. तसेच त्याच्याकडे किमान 10 गुंठे आणि जास्तीत जास्त 5 एकर जमीन असणे गरजेचे आहे.