Multibagger Stocks कसे शोधावे ? समजून घेऊ अधिक

हा आर्टिकल हा फक्त एज्युकेशनल पर्पस साठी आहे. तर आपण आज थोडी चर्चा करणार आहोत की multibagger stocks कसे शोधायचे. मल्टीबॅगर स्टॉक हा असा स्टॉक आहे जो एका विशिष्ट कालावधीत त्याच्या मूळ गुंतवणुकीच्या मूल्यापेक्षा कित्येक पटीने परत करू शकतो. “मल्टीबॅगर” हा शब्द “मल्टी” म्हणजे एकाधिक आणि “पिशवी” पासून आला आहे, जो प्रारंभिक गुंतवणुकीच्या वेळेचा संदर्भ देतो. उदाहरणार्थ, टू-बॅगरचे मूल्य दुप्पट झाले आहे (सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या 2 पट) तर टेन-बॅगरचे मूल्य दहापट वाढले आहे (10x the initial investment).

Multibagger Stocks
Multibagger Stocks

Multibagger Stocks शोधण्याची प्रक्रिया

स्टेप १

जसे आपल्याला माहिती आहे की शेअर बाजारामध्ये भरपूर सेक्टर मधल्या कंपनीस कार्यरत असतात.तर एवढ्या सेक्टर्स मधून कोणता सेक्टर काढावा? हा पहिला प्रश्न.

तर याचं उत्तर आहे की फ्युचर ओरिएंटेड बिझनेस कोणता आहे हे आपण विचार केला पाहिजे, असे क्षेत्र की जे भविष्यामध्ये आपल्याला वाटतायत की वाढतील.

उदाहरण द्यायचे म्हणलं तर artificial intelligence, renewable energy, green hydrogen, drone sector, semiconductor etc किंवा तुम्हाला आणखी कशात स्कोप वाटत असेल तर ते.

स्टेप २: रिस्क फॅक्टर

आता काही लोक खूप रिस्क घेऊन खूप रिटर्न्स ची अपेक्षा ठेवतात . ते पूर्णपणे चुकीचे आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

कॅपिटल जास्त असेल तर कमी रिस्क वाले स्टॉक आपण घेऊ शकतो, आणि  जास्त रिस्क वाले स्टॉक असतील तर आपण कमी कॅपिटल त्यात गुंतवू शकतो. म्हणजे एकदम सेफ आपण राहील पाहिजे थोडक्यात ज्यामुळे आपले कॅपिटल आपण चांगल्या प्रकारे मनेज करू.

कमी रिस्क घेयची असेल तर आपण फ्युचर ओरिएंटेड बिझनेस चा असा ग्रुप घेऊ शकतो जो खूप चांगल त्यात काम करत आहे.

उदाहरण: समजा आपल्याला वाटत असेल की EV मधे अशी अशी ग्रोथ होऊ शकते. तर त्यातली कार्यरत कंपनी आपण अनालिसीस करणार. उदाहरण म्हणून आपण म्हणू की त्यातली टॉप ची कंपनी कोणती हा आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे. बर, मग ती कंपनी काय त्या क्षेत्रात काम करत आहे.  चांगल काम करत आहेका.

असेच बाकीच्या क्षेत्रासाठी पण.

स्टेप ३:

काही लोक म्हणत असतील, की माझी रिस्क घेण्याची अमुक अमुक तयारी आहे, मी स्मॉल कॅप, मिड कॅप गुंतवेल.

पण सत्य सांगायचे झाले तर स्मॉल कॅप आणि midcap मधे multibagger stocks शोधणे ही खूप कठीण गोष्ट आहे. 

पैसे कोणीही लावू शकत. पण तर्क, त्यावर एक ठोस विचार, अनालिसीस हे जास्त महत्वाचे असते. शेअर वर गेला, खाली पडला तर त्यावेळी होल्ड करण्याची क्षमता ही त्या आपण केलेल्या अनालिसीस ने आपल्या तर्काने च येते.

आणखी एक ,आपल्याला जर एक रेफरन्स म्हणून आणखी अनालीसिस करायचं असेल तर आपण हे सुद्धा बघू शकतो की DII, म्युच्युअल फंड कोणत्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस मधून invest करण्यात इंटरेस्टेड आहेत. पण त्यांना blindly follow करणे हा कधीही मूर्खपणा आहे.

आपण फक्त अनेख म्युच्युअल फंड shortlist करू शकतो की इथे इथे खूप mutual funds पैसे लावत आहेत. मग आपल अनालिसिस ला ते पटतंय का. पटत नसेल तर आपला आपला निर्णय.

दुसर म्हणजे अस की आपण स्वतः वेग वेगळ्या वेबसाईट वरून डिटेल महिती घेऊ शकतो जसें की screener.in, moneycontrol, किंवा trendlyne, tickertape etc.

आपण आणखी एक गोष्ट छोट्या कंपनी मधे जाताना लक्षात घेतली पाहिजे की तिथे ROE, ROCE, PE हे सगळे नीट नसणार च. कारण चांगले रेशो हे मोठ्या आणि चांगल्या कंपनीमध्ये च आपण बघू शकतो. पण फ्युचर ओरिएंटेड बिस्नेस चे मॅट्रिक्स हे फ्युचर मधे ग्रो होऊ शकतात तीच तर रिस्क आहे .

Volatility ही खूप जास्ती असते म्हणून रिस्क कमीत कमी किंवा न घेतलेली चांगली. चांगल्या कंपनी आणि कमी रिस्क कधी पण आपण प्रेफर केले पाहिजे.

आपण नेहमी स्वतः स्टडी केला पाहिजे कंपनीचा. कोणाच्याही भरोष्यावर विश्वास ठेऊन पैसे गुंतवणे हे योग्य नव्हे.

अधिक वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
WhatsApp Link