Stock Market Operators म्हणजे काय? कोण असतात हे आणि कसे ओळखायचे यांना ?

Stock Market Operators : तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्टॉक मार्केट ऑपरेटर्स म्हणजे एक असे कार्टल किंवा एक लोकांचा समूह जे स्टॉक ला मेन्यूपुलेट करतात. हे कधीकधी कंपनीच्या आतले लोक सुद्धा असू शकतात, स्टॉक मार्केट ऑपरेटर्स ला आपण दुसऱ्या भाषेमध्ये स्पिक्युलेटर सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच जसे की उदाहरण म्हणलं तर एखादा स्टॉक असतो की जो आपल्याला वाटेल की खाली जाईल पण तो खाली जात नाही तर वरती जातो आणि याच्या विपरीत सुद्धा होऊ शकते. प्रत्येक वेळेसच मार्केट विरुद्ध गेलं म्हणजे ऑपरेटर्स त्यामागे कारण आहेत असे नसते तर आपण जाणून घेऊया आता की ऑपरेटर्स नक्की कसे ओळखायचे. तर चला आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊया.

Stock Market Operators

Stock Market Operators Example

एक गाव असते आणि तिथे शंभर लोक असतात आणि त्या गावाच्या जवळच झाड असतात जिथे माकड असतात तर आता त्या गावात काय होतं एक जण येतो आणि तो सगळ्यांना सांगतो की मला इथे माकड पाहिजे आहेत आणि तुम्ही जर का मला एक माकड पकडून आणून दिला तर त्याची किंमत शंभर रुपये मी तुम्हाला देईल पण हे ऐकून कोणी काय त्याच्याकडे येईना मग त्याने शंभर रुपयाचे दोनशे रुपये केले तरी कोणी येईना मग त्याने पाचशे रुपये केले की एक माकड आणून द्या.

आणि पाचशे रुपये घेऊन जावा मग गाव वाल्यांना थोडं वाटले की चला करून बघू आणि गाववाल्यांनी त्या बाजूचे जंगल मधून एक एक माकड आणून तर खरेदी करायला द्यायला सुरुवात केली आता तो खरेदी करणे ते माकड घेऊन 500 500 रुपये घेतले अशा प्रकारे त्यांनी पूर्ण गावांमध्ये पन्नास हजार रुपये वाटले आता गाववाल्यांना वाटले की अरे ही तर खूप चांगली गोष्ट आहे आपण फक्त शेजारच्या जंगलातून माकड आणून याला दिले आणि आणि त्याबद्दल पाचशे पाचशे रुपये दिले आणि तो खरेदी कर सुद्धा निघून गेला पण गाववाल्यांना त्याच्यावर विश्वास बसला आणि कॉन्फिडन्स आला की हा पैसे कमवण्याचा मार्ग किती सोपा आहे.

मग काही महिन्यांनी तो खरेदी कर पुन्हा आला आता तो म्हणाला की मला आता माकड पाहिजेत पण दोन हजार रुपयाला म्हणजेच मी दोन हजार रुपये देईल एक माकडाच्या बदल्यात, आणि त्याने अर्जंसी म्हणून किंमत वाढवली आणि म्हणाला की जर दोन दिवसाच्या आत मध्ये तुम्ही मला माकडे आणून दिले तर मी पाच हजार रुपये देईल हे ऐकून गाववाल्यांच्या तोंडाला पाणी सुटले की आधी पाचशे रुपये देत होता आणि आता दोन हजार रुपयांच्या ऐवजी पाच हजार रुपये देतोय मग तर आपला खूप फायदा होईल.

पण जंगलामध्ये न च्या बरोबर माकडे होती मग त्याच वेळी त्या जंगलामध्ये एक माकड विक्रेता पण आला आणि तो माकड दोन हजार रुपयाला विकत होता. मग लोकांनी अशी शक्कल लढवली की या विक्रेत्याकडून जर का आपण दोन हजार रुपयाला माकडे घेतली आणि खरेदी करायला दिली तर तीन हजार रुपये आपल्याला एका माकडाची मिळतील मग त्यांनी तसे केले आणि दोन दोन हजार रुपये करून शंभर माकडे घेतली पूर्ण गाव वाल्यांचे दोन लाख रुपये त्यामध्ये गुंतवले गेले आणि जोपर्यंत ते माकडे घेऊन ते खरेदी करा कडे जाणार तेवढ्यात तो खरेदी कर निघून गेलेला. तर झाले असेल तो जो माकड विक्रेता होता आणि जो खरेदी करत होता ते एकाच टीम मधून होते आणि यालाच ऑपरेटर म्हणतात. 

यालाच आपण जर का आता शेअर मार्केटला रिलेट केलं तर जे माकड असतं जास्त शेअर जे खरेदी कर विक्रीकर होते तेवढे ऑपरेटर आणि गावातले लोक होते ते रिटेल इन्वेस्टर. विचार करण्याची गोष्ट अशी आहे की जो तो माकड खरेदी करत होता त्याने 500 500 करून 50 हजार रुपये गुंतवणूक केली विश्वास जिंकला गाववाल्यांचा आणि त्यानंतर दोन लाख रुपये कमावून त्यांना चुना लावला. आता गाववाल्यांनी करायचे तरी काय कारण त्यांच्याकडे पैसे तर राहिले नाहीत राहिले ते माकड त्या माकडाचे ते करणार काय, काहीच नाही.

असेच शेअर मार्केटमध्ये ऑपरेटर्स असतात त्यांच्याकडे खूप पैसा असतो. हे चांगले स्टॉक मध्ये सुद्धा असू शकतात आणि वाईट स्टॉक मध्ये सुद्धा म्हणजे चांगल्या स्टॉक अशा प्रकारे पाडणार की लोकांनी घाबरून त्यातून निघून जाव. आणि खराब स्टॉकला हे वरती अशाप्रकारे घेऊन जाणार की लोकांना फोमो बाईंग करू वाटणार. फोमो बाईंग म्हणजे एखादा स्टॉक वर गेला आणि आपण आपला प्रॉफिट मुकला आणि अजून आपण तो प्रॉफिट मिस करू नये म्हणून घाई गडबडीत विकत घेणे एखाद्या शेअर त्याला फोमो बाईंग म्हणतात म्हणजेच फियर ऑफ मिसिंग आऊट. 

ऑपरेटर चे मेन टारगेट हे रिटेल इन्वेस्टर असतात. त्यांना असे रिटेल इन्वेस्टर पाहिजे असतात की जे ग्रेडी आहेत खूप लालची आहेत जे नवीन आहेत ज्यांना शेअर मार्केटचे ज्ञान जास्ती खोलात नाही किंवा त्यांना झटपट पैसे कमवायचे आहेत. अशाप्रकारे ते कमी किमतीमध्ये शेअर्स घेतात हळूहळू किंमत वाढवत जातात आणि वरती जाऊन स्वतःचा प्रॉफिट झाल्यावर विकून मोकळे होतात आणि मग जे गुंतवणूकदारांनी ते शेअर्स विकत घेतलेले असतात त्यांना खरेदी कर कोणी मिळत नाही

आपण जाणून घेऊया की हेच ऑपरेटर्स असतात हे कुठल्या स्टॉक ला टार्गेट करतात तर जास्त करून हे स्टॉक असतात पेनि स्टॉक्स. आपण जर का बघितलं तर प्रत्येक वर्षी अशा कितीतरी कंपनीज असतात की ज्या अचानक पणे खूप वरतीपर्यंत जातात आणि ज्यांची किंमत ही दोन दोन ,चार चार , पाच पाच, दहा रुपये असते. पण ती खूप वरपर्यंत जातात कारण याच कंपनीत असतात ज्या ऑपरेट करायला खूप सोप्या असतात एका ऑपरेटरसाठी कारण इथे रिटेल निवेशक असतात.

मग मग अशा मध्ये आपण काय केले पाहिजे तर आपण फंडामेंटल स्ट्राँग कंपनीज आहेत ज्या लार्ज कॅप असतात किंवा ज्या मेडिकॅप ग्रोथ स्टॉक्स असतात ज्यांचे बिझनेस चांगले असतात अशा कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे की ज्यांची मॅनेजमेंट चांगली आहे ज्यांचा उद्योग चांगला आहे याचा अनालिसिस आपण केला पाहिजे आणि तिथे पेशंटली होल्ड केलं पाहिजे जर त्यांचं मॅनेजमेंट उद्योग हा चांगला असेल तर, आणि हे तेव्हा होऊ शकतं जेव्हा आपण लॉन्ग टर्म विजन घेऊन इन्व्हेस्ट करत असतो.

यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपल्या स्वतःच्या एनालिसिस वर विश्वास ठेवला पाहिजे तेवढे स्वतःचे स्किल्स डेव्हलप केले पाहिजे लोक काय म्हणतात कोणता स्टॉक रेकमेंड करतात यावर आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top