पोस्ट ऑफिसच्या या 5 बचत योजना देतात बँकेपेक्षा जास्त व्याजदर.

आजच्या महागाईच्या काळात पैसे कमावणे ही फार मोठी गोष्ट नाही परंतु पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे हे फार महत्त्वाचे आहे. आजकाल महागाई मुळे कितीही कमवले तरी हाती काहीच राहत नाही त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी गुंतवणुकीवर भर देणे खूप गरजेचे आहे.

आजकाल तरुणपिढी शेयर मार्केट SIP फॉरेक्स वेगवेगळ्या फ्लॅटफॉर्म वर गुंतवणूक करत आहे. परंतु अजून काही लोक आहेत जे आपले पैसे बँक किंवा एफडी मध्ये गुंतवून ठेवत आहेत तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात पोस्ट ऑफिस च्या 5 बचत योजनांबद्दल माहिती देणार आहोत ज्यात तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळेल तर जाणून घेऊया सविस्तर.

गेल्या काही दिवसांपासून पोस्ट ऑफिस मध्ये लोकांचा गुंतवणुकीचा कल वाढलेला दिसून येत आहेत बऱ्यापैकी बँकांपेक्षा लोक पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणुकीला पसंती देत आहेत.

1) राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना:-

राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना ही योजना एका एफडी FD प्रमाणे काम करते. बँकांमध्ये ही योजना FD किंवा TD म्हणून ओळखली जाते. या योजनेत तुम्ही 1 ते 5 वर्षाच्या कालावधी पर्यंत पैसे गुंतवू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाकाठी 6.9% व्याज आणि 5 वर्षांच्या कमाल मुदत ठेवीसाठी 7.5% एवढा व्याजदर मिळतो. बँकांच्या तुलनेत हा व्याजदर जास्त आहे. या योजनेत तुम्ही 1 लाख गुंतवले तर 5 वर्षानंतर तुम्हाला 1 लाख 37 हजार 500 एवढी रक्कम मिळणार आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

2) राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना:-

या योजेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळते. या योजनेत तुम्ही जर 1 लाख गुंतवले तर 5 वर्षाच्या कालावधी नंतर तुम्हाला 37 हजार व्याज मिळणार आहे. महिन्याला या रकमेवर 7.5 एवढं व्याजदर मिळत आहे.

3) ज्येष्ठ नागरिक बचत योजना:-

या योजनेसाठी केवळ 50 ते 60 वर्षापुढील पात्र आहेत. पोस्टाच्या या बचत योजनेवर सर्वाधिक व्याजार आहे. या योजनेवर पोस्ट ऑफिस 8.2 टक्के एवढा व्याजदर आहे. जर का तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांत तुम्हाला त्यावर 41 हजार व्याज मिळेल म्हणजेच, जर तुम्ही जास्तीत जास्त 30 लाखांची गुंतवणूक केलीत तर तुमच्या हातात 5 वर्षांनंतर 42,30,000 रुपये असतील.

4) महिला सन्मान बचत योजना:-

महिला वर्गाला बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही महिलांसाठी खास योजना आहे. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि दर वर्षी 7.5% एवढा व्याजदर आहे. पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत, ही योजना अल्प-मुदतीच्या बचतीसाठी जास्त व्याज देते. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान रूपये 1000 ते 2,00,000 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

5) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र:-

या योजनेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा आहे.या योजनेत तुम्ही कमीत कमी 1000 रूपये गुंतवणे आवश्यक असून गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. पोस्टाची एकमेव ही योजना 7.7% चक्रवाढ व्याज देते आणि पाच वर्षांच्या शेवटी एकरकमी व्याज दिले जाते. या योजनेतील व्याजदरात कोणताही बदल होत नाही. जर का खातेदाराचा मृत्यू झाला किंवा संयुक्त खाते असलेल्या जोडप्याचा घटस्फोट झाला तरच या योजनेतून मुदतीच्या आधी बाहेर पडता येते. उदाहरणार्थ, जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात 1,44,903 रुपये असतील. याचा अर्थ, तुमची गुंतवणूक रक्कम 40% पेक्षा जास्त वाढलेली असेल.

Leave a comment