भारत सरकारमार्फत प्रत्येक राज्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबवल्या जातात. परंतु या योजनांचा लाभ नागरिकांना तेव्हाच घेता येतो जेव्हा नागरिक 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवून घेतील. या ज्येष्ठ नागरिक कार्डचे अनेक फायदे आहेत. ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Senior Citizens Card Benefit
ज्येष्ठ नागरिक कार्ड फायदे
· ओळख प्रमाणपत्र म्हणून या कार्डचा वापर करता येतो.
· या कार्डच्या मदतीने रेल्वेच्या प्रवास सवलत मिळवता येते.
· ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकिटघरांमध्ये स्वतंत्र तिकीट काउंटर तयार करण्यात आलेले आहे.
· या कार्डच्या मदतीने विमानाच्या प्रवास भाड्यात सवलत मिळवता येते.
· कार्ड असल्यास आयकरात सूट मिळते तसेच आयकर कमी भरावा लागतो.
· कोणत्याही बँकेतील बचत योजनांवर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर दिला जातो. तसेच कर्जा देताना देखील कमी व्याजाने पैसे दिले जातात.
· पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवलेल्या पैशांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना जास्त लाभ आणि सुविधा मिळतात.
· शासकीय दवाखान्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार तसेच काही मोठ्या आजारांसाठी सवलतीच्या दरात उपचाराच्या लाभ मिळतो.
· कमी खर्चात शासकीय वृद्धाश्रमामध्ये प्रवेश मिळवता येतो. Benefits of senior citizen card
ज्येष्ट नागरिक कार्डसाठी येथे करा अर्ज
ज्येष्ठ नागरिक कार्ड हे 60 वर्षे पूर्ण झाल्या नंतर बनवायचे असते. आपले सरकार या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरुन तुम्ही ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी ऑनलाईन अर्ज भरु शकता. तसेच शासनाच्या CSC सेंटर्स किंवा सेतू केंद्रातून देखील ज्येष्ठ नागरिक कर्ड मिळविण्यासाठी अर्ज करता येतो. Benefits of senior citizen card
ज्येष्ठ नागरिकांकरिता विविध योजना
ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षांनतरचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार या दोन्ही शासनांच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड अत्यंत महत्त्वाचे असते.
· वृद्धाश्रम योजना.
· मातोश्री वृद्धाश्रम योजना.
· ज्येष्ठ नागरिक ओळख प्रमाणपत्र.
· महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही एसटीतून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत.
· संजय गांधी निराधार अनुदान योजना.
· श्रावण बाळ योजना.
· इंदिरा गांधी योजना.
· ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन.
· सीनियर सिटीजन बचत योजना.(SCSS)
तुम्ही जर का वयाची 60 वर्षे पूर्ण केली असतील तर ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार करुन घेऊन तुम्ही शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता आणि सोबतच इतर सवलती देखील मिळवू शकता. Benefits of senior citizen card
Mahesh chougule
60 वर्षे पूर्ण झालेली आहेत ज्येष्ठ नागरिक सुविधा मिळावी