बाजारात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची एन्ट्री! ‘या’ पाच शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे वाचणार लाखो रुपये, पाहा किंमत  

भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. येथील जवळपास 65 टक्क्यांहून अधिक नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. तसेच येथील शेतकऱ्यांना शेती करताना खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच लाखो रुपये शेतीमध्ये खर्चही करावे लागतात. शेतकऱ्यांना नांगरणीसाठी जास्त कष्ट करावे लागू नये म्हणून बाजारात ट्रॅक्टरची निर्मिती झाली. परंतु आजच्या काळात ट्रॅक्टरने शेतीची मशागत करणे देखील सोयीचे राहिलेले नाही. ज्याचं कारण म्हणजे वाढलेली महागाई. आज पेट्रोल डिझेलचे दर पाहता शेतकऱ्यांना शेतीमध्ये ट्रॅक्टरने मशागत करणे ही अवघड झाले आहे. आता या समस्येवर कायमचाच एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे देशात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची निर्मिती झाली आहे. याचा फायदा देशातील शेतकरी बांधवांना होणार आहे. 

देशा इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पेट्रोल डिझेल महाग झाल्याने लोकांना पेट्रोल डिझेलवरच्या गाड्या चालवणे परवडनासे झाले आहे. या महागाईवर मात करण्यासाठी लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. परिणामी शेतीसाठीही ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलसाठी पैसा खर्च करावा लागत असल्याने या समस्येवर मात करण्यासाठी बाजारात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची निर्मिती झाली आहे. आता शेतकरी या ट्रॅक्टरच्या माध्यमातून हजारो रुपयांचा खर्च वाचवू शकणार आहेत. आता शेतकरी बांधवांनी कोणत्या कंपनीचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करावेत याबाबतचा सल्ला आज आम्ही या लेखातून तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला जर उत्तम परफॉर्मन्स करणारा शेतीसाठी ट्रॅक्टर हवा असेल तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

Electric Tractor
Electric Tractor

सोनालीका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

शेतकरी बांधवांना तुम्ही सोनालिका कंपनीचा ‘सोनालीका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ची निवड करू शकता. सोनालिकाच्या ट्रॅक्टरची बॅटरी जवळपास 25.5 KW अशी असून त्याची मोटार देखील खूप शक्तीशाली आहे. तसेच ही मोटार 15 HP पॉवर जनरेट करते. सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर जवळपास 500 किलो लोडिंग क्षमता पेलू शकतो. ज्याला 1420 MM व्हीलबेसमध्ये तयार करण्यात आला आहे. सोनालिका टायगर या ट्रॅक्टरची किंमत भारतात जवळपास 5 लाख 91 हजार ते सहा लाख 22 हजार रुपये इतकी आहे. शेतकऱ्यांनी हा जास्त पावर इंजिन असलेला ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.  

ऑटोनेक्स्ट X45H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

त्याचबरोबर शेतकरी बांधव ‘ऑटोनेक्स्ट X45H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ या ट्रॅक्टरची देखील निवड करू शकतात. या ट्रॅक्टरची बॅटरी क्षमता 32KW इतकी शक्तिशाली आहे. ही बॅटरी 45 एचपी इतकी पॉवर निर्माण करू शकते. तसेच या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता 800 इतकी आहे. ऑटोनेक्स्ट X45H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला स्मार्ट इलेक्ट्रिकली कंट्रोल पॉवर स्टेरिंग देण्यात आले आहे. ट्रॅक्टरची किंमत ही 6 लाख 40 हजार रुपये ते 6 लाख 72 हजार रुपये इतकी आहे.

सेलेस्टीयल 55 एचपी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

सेलेस्टीयल 55 एचपी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अतिशय शक्तिशाली असून, या ट्रॅक्टरमधून 55 एचपी इतकी हॉर्स पॉवर जनरेट केली जाते. हा ट्रॅक्टर जवळपास 4 हजार किलो वजन सहजपणे उचलू शकतो. हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर प्रति तास 30 किलोमीटर वेगाने धावू शकतो. या ट्रॅक्टरची किंमत पाच लाख रुपये इतकी आहे. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

HAV 45 S1 ट्रॅक्टर

HAV 45 S1 या ट्रॅक्टरचे 4TNV84 इंजिन आहे. हे इंजिन 44 HP पॉवरसह 3 हजार आरपीएम जनरेट करते. हा ट्रॅक्टर इंधनावर देखील चालू शकतो. हा ट्रॅक्टर 1 हजार 800 किलो वजन सहजपणे उचलू शकतो. या ट्रॅक्टरचे स्टेरिंग मॅक्स कव्हर टाईप आहे. या ट्रॅक्टरची किंमत 8 लाख 49 हजार रुपये इतकी आहे.

ऑटोनेक्स्ट X35H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

ऑटोनेक्स्ट X35H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर या ट्रॅक्टरचे 20 KW बॅटरी क्षमतेची मोटार आहे. या मोटारीतून 27 HP पॉवर जनरेट केली जाते. हा ट्रॅक्टर जवळपास 1 हजार 400 किलो वजन उचलु शकतो. याचे हायड्रोलिक पॉवर स्टेरिंग आहे. हा ट्रॅक्टर नॉर्मल चार्जिंगमध्ये आठ तासात चार्ज होतो. तसेच फास्ट चार्जिंगमध्ये दोन तासात होते. या ट्रॅक्टरची किंमत 6 लाख रुपये इतकी आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top