5 हजाराच्या गुंतवणुकीतून करा लाखोंची कमाई, सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या | PM Jan Aushadhi Kendra

pm jan aushadhi kendra

तुम्ही फार्मासिस्ट असाल तर शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही दर महिना चांगली कमाई करु शकता. ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे भारतभर सुरु करण्यात ये आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण देशात 10 हजार पेक्षाही जास्त केंद्रे सुरु असून या संख्येत वाढ करण्याचे शासनाने ठरवले आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःचे जन औषधी केंद्र सुरु करु शकता. योजनेसाठी अर्ज करण्याचे शुल्क केवळ 5 हजार रुपये भरुन तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता. PM Jan Aushadhi Kendra

जनऔषधी केंदाचे वैशिष्ट्य

जन औषध केंद्रांमध्ये 1800 प्रकारची औषधे आणि 285 वैद्यकीय उपकरणे ठेवण्यात आली आहेत. इतकेच नाही तर ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जनऔषधी केंद्रांवर 50 ते 90 टक्के कमी किमतीत औषधे उपलब्ध आहेत.

अर्जा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, पॅन कार्ड

·        फार्मासिस्ट नोंदणी प्रमाणपत्र

·        केंद्रासाठी जागेचा पुरावा

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता

·      अर्जदाराकडे डी. फार्मा किंवा बी. फार्माचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

·      जन औषधी केंद्र सुरु करण्यासाठी सुमारे 120 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे

अशाप्रकारे योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करा

  • https://janaushadhi.gov.in/  या लिंकवर क्लिक करुन तुम्ही जन औषधी केंद्र या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
  • वेबसाईटच्या मुख्य पानावरील  Apply For Kendra या पर्यायावर क्लिक करा.
  • नव्या पानावर पोहोचल्यावर  Click Here To Apply पर्यायावर क्लिक करा.
  • आता  वेबसाईटसाठी sign In  करण्यासाठी फॉर्म उघडेल, त्याखाली असलेला Register now पर्याय निवडा.
  • नोंदणी अर्जात विचारलेली माहिती पूर्ण भरा.
  •  त्यानंतर पुढे ड्रॉप बॉक्समध्ये तुमचे राज्य निवडा आणि आयडी-पासवर्ड विभागात log in साठी भरलेली पासवर्ड भरा.
  • त्यानंतर नियम आणि अटींची यादी उघडेल त्याच्या शेवटी बरोबर अशी टिक करा.
  • त्यानंतर तुमची कागदपत्रे, फोटो विचारलेली इतर माहिती योग्य पद्धतीने भरा.
  • शासनाकडून तुमच्या कागदपत्रांची चाचपणी केली जाईल आणि तुम्हाला त्याबद्दल ईमेल येईल,
  • त्यानंतर तुम्हाला अर्जाचे शुल्क भरणे आवश्यक आहे.

केंद्र सरकार अशा प्रकारे करते मदत

योजनेचा लाभ घेऊन लाभार्थ्याने प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सुरु केल्यानंतर   शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. 5 लाख रुपये तसेच  15,000 रुपयांपर्यंतच्या औषधांच्या मासिक खरेदीवर 15% सूट देण्याचा नियम केंद सरकारमार्फत  करण्यात आला आहे.

Leave a comment