15 ते 20 वर्षांपुर्वी उधारी घेणे किंवा कर्ज काढून वस्तू खरेदी करणे ही खूप मोठी बाब समजली जात असे. अगदीच अतीतटीच्या वेळी हे मार्ग स्वीकारले जात असत. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आज सर्रास कोणतीही वस्तू खरेदी करताना कर्ज घेतले जाते, किंवा ती वस्तू EMIवर म्हणजे हप्त्यांवर खरेदी केली जाते. तसेच महिन्याचा खर्च उधारीच्या पैशांवर म्हणजेच क्रेडिट कार्डवर पुर्ण केला जातो. यामध्ये आता कोणतेही वावगे किंवा अडचण वाटेल असे काही राहिलेले नाही. परंतु या क्रेडिट कार्ड वापराचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की, क्रेडिट कार्डचा स्मार्टली वापर कसा करावा. How to use credit card smartly
How To Use Credit Cards Smartly
क्रेडीट कार्ड लिमिटच्या 50%पेक्षा जास्त खर्च करणे टाळा
तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडीट लिमिटच्या 50% पेक्षा जास्त खर्च करु नका, त्याने तुमच्या खर्चांवर नियंत्रण येईल आणि बिल भरातना अडचण येणार नाही.
क्रेडीट कार्ड खर्चासोबत मिळणाऱ्या बोनस आणि कॅशबॅकचा फायदा घ्या
क्रेडीट कार्डच्या माध्यमातून खरेदी करताना वापरकर्त्याला काही बोनस आणि कॅशबॅक मिळतो याचा फायदा घ्या. त्यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि तुमच्या गरजा देखील भागल्या जातील. How to use credit card smartly
देय तारखेच्या आधीच क्रेडीट कार्ड बिल भरण्याची सवय ठेवा
क्रेडीट कार्डचे बिल भरण्याची तारीख असेल त्या आधिच बिल भरा, कारण बिल भरण्यास उशीर झाला किंवा तारिख चुकली तर जास्तीचे व्याज वापरकर्त्याला भरावे लागते, आणि जर का वेळेत बिल भरले तर नक्कीच क्रेडीट कार्ड वापरकर्त्याचा सिबिल स्कोअर चांगला राहतो. How to use credit card smartly
क्रेडीट कार्ड खर्चाचा तपशील ठेवा
तुम्ही तुमचे क्रेडीट कार्ड ज्या ज्या ठिकाणी वापरले आहे, त्याचा योग्य तपशील ठेवा. वेळोवेळी खर्च केलेली रक्कम तपासत रहा. त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहते आणि जास्तीच्या बिलाचा बोला महिना अखेर भरावा लागत नाही.
वरील मुदद्यांचा योग्य अभ्यास करुन क्रेडीट कार्ड वापरले तर नक्कीच वापरकर्त्याला फायदा होतो, आणि हव्या त्या सुविधा किंवा वस्तू खरेदी करता येतात. तुम्ही देखील क्रेडीट कार्ड वापरत असाल तर खर्च करताना योग्य ती काळजी घ्या. क्रेडीट कार्डचा स्मार्टली वापर करा. How to use credit card smartly