भारतात बनावट ओळखपत्रांवर LPG सिलेंडर विकत घेणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी शासनाने नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमांप्रमाणे नागरिकांना देखील काही गोष्टींची जाहीर सुचना देण्यात आली आहे. नक्की या कोणत्या सुचना केंद्र शासनातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत, ते आपण आजच्या लेखात पाहू.
LPG eKYC
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातून घोषणा जाहीर
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी 10 जुलै 2024 रोजी पेट्रोलियम कंपन्याद्वारे आधारद्वारे एलपीजी ग्राहकांचे ई-केवायसी पडताळणी केली जात असल्याचे जाहीर केले आहे. LPG e-KYC म्हणजेच ऑनलाईन ग्राहक पडताळणीची ही प्रक्रिया बनावट ग्राहकांवर आळा घालण्यासाठी केली जाते असल्याचे देखील त्यांनी सांगितले. घरगुती सिलेंडर कमी दरात मिळत असल्याने बनावर ओळखपत्रावर घरगुती सिलेंडर मिळवला जातो व तो व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरला जात असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले असल्याने हा e- KYC चा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
भारतात LGP सिलेंडरचे भाव काय आहेत?
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 803 ते 900 रुपयांना उपलब्ध असून हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1646 ते 2000 रुपयांना मिळत आहे. बरेच नागरिक बनावट ओळखपत्रावर घरगुती सिलेंडर मिळवून तो व्यवसायिक कामांसाठी वापरत आहेत. या गोष्टीला आळा बसावा म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे E -KYC चा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
आधार क्रमांकाच्या मदतीने करा LPG EKYC
मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि सर्वे केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 32.64 कोटी सक्रिय घरगुती एलपीजी वापरकर्ते आहेत. याप्रमाणे घरगुती सिलेंडर ग्राहकांनी वितरक कंपनीच्या ॲपद्वारे ई-केवायसी पूर्ण करायची आहे. कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी LPG कनेक्शन संलग्न असेल. तसेच आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर सर्व नोटिफिकेशन्स पाठवण्यात येणार आहेत.