मुख्यमंत्री वयोश्री योजनें तर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार, जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana – राज्य शासनाच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. जेणेकरून नागरिकांना या योजनांचा फायदा होईल. खरं तर, वयोवृद्ध असलेले नागरिक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या कोलमडतात. त्याचवेळी त्यांना आर्थिक (Financial) आधार देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. याच योजनांपैकी एक असलेली योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (Chief Minister Vayoshree Yojana) होय. आता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ नक्की काय आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज करावा? तसेच या योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? या योजनेबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे?

तर ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ ही राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यासाठी दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत वयाची 65 वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना आर्थिक लाभ मिळतो. आता हा आर्थिक लाभ नेमका कशासाठी दिला जातो याबाबत माहिती जाणून घेऊयात. 

ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयामुळे दिव्यांगत्व किंवा अशक्तपणा अशा समस्या उद्भवतात. यावर उपाय करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनें’तर्गत आवश्यक साह्य साधने व उपकरणे खरेदी करण्यासाठी त्यासह मनःस्वास्थ्य केंद्र, योगपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याकरता त्यांना 3 हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन देखील समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

कोणत्या उपकरणांसाठी मिळणार मदत? 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत खालील उपकरणांसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

1. चष्मा

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

2. श्रवणयंत्र

3. ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर

4. फोल्डिंग वॉकर

5. कमोड खुर्ची

6. निब्रेस

7. लंबर बेल्ट

8. सर्वलाइकल कॉलर

मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 

1. आधारकार्ड / मतदान कार्ड

2. राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स

3. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो

4. स्वयं-घोषणापत्र

5. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजने च्या लाभासाठी पात्रता काय आहे? Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility

तर ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, याबाबत माहिती जाणून घेऊयात. ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभासाठी वय 65 वर्षे 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण असलेले व त्यावरील ज्येष्ठ नागरिक पात्र असतील. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांच्या आत असले पाहिजे. तसेच त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच निवड केलेल्या जिल्ह्यातील जवळपास 30 टक्के लाभार्थी संख्या महिलांची असणार आहे. 

वाचा सविस्तार – या 26 जिल्ह्यन्ना मिळणार नुकसान भरपाई

मुख्यमंत्री वयोश्री योजने चा लाभ कसा मिळतो?

या योजनेचा लाभ वरील पात्रता पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या आधार संलग्न वैयक्तिक बँक खात्यावर एकरकमी 3 हजार रुपये थेट लाभ वितरण (डीबीटी) प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येतात. ज्यावेळी लाभार्थ्याला लाभ वितरण होईल त्यानंतर विहित केलेली उपकरणे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतले असल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे लागेल. नाहीतर सदर व्यक्तीकडून ही रक्कम परत वसूल केली जाईल. 

मुख्यमंत्री वयोश्री योजने बाबत माहितीसाठी संपर्क 

पात्र अर्जदार नागरिकांना अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येरवडा (दूरध्वनी क्रमांक 020-29706611 तसेच ईमेल-acswopune@gmail.com) संपर्क साधण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.

Leave a comment