12 वर्षे जुना वाद मिटवणारी ‘सलोखा योजना’ काय आहे? जाणून घ्या अर्ज कसा करावा? अटी आणि शर्ती | Salokha Yojana

Salokha Yojana – ज्याप्रमाणे ‘भाऊ तिथे भाऊकी’ ही येतेच. त्याचप्रमाणे शेत तिथं बांध येतोचं. पण तुम्हालाही माहितचं आहे बांध आला की भांडणही आलंचं. तसेच शेतजमिनीच्या ताब्यावरून भावांमध्ये किंवा इतर शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. काही वेळा हे वाद टोकाला जाऊन जीवघेणे ठरतात. आता शेतीचे वाद मिटवायचे म्हटले तर न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. त्यावेळी मग भल्याभल्यांना घाम फुटतो. यात सर्व परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव ‘सलोखा योजना’ आहे. आता राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सलोखा योजना का आणली आहे? तसेच या योजनेचे फायदे काय आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

Salokha Yojana
Salokha Yojana

सलोखा योजना काय आहे?

तर शेतकरी मित्रांनो 13 डिसेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ‘सलोखा योजने’ला मंजुरी देण्यात आली होती. खरं तर जमिनीच्या ताब्यावरून शेतकऱ्यांमध्ये आपापसात मोठे मोठे वाद होतात. हेच वाद मिटवण्यासाठी समाजामध्ये सलोखा निर्माण करण्याची प्रचंड गरज होती. हीच गरज लक्षात घेता राज्य शासनाने ‘सलोखा योजना’ आणली आहे. या योजनेचा जमिनीचे वाद असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ज्याचं कारण म्हणजे जमिनीचे वाद सोडवण्यासाठी कागदपत्रे किंवा नोंदणीसाठी भरमसाठ पैसे खर्च करावे लागतात. मात्र या योजनेअंतर्गत शेतकरी अगदी कमी पैशात आपल्या जमिनीचे वाद किंवा ताबा सहज मिळवू शकतात. तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूयात ‘सलोखा योजना’ नेमकी काय काम करते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

सलोखा योजने अंतर्गत नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कात सवलत

एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरील जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील जमीन पहिल्या शेतकऱ्याच्या नावावर, अशा शेतकऱ्यांना अदलाबदल झालेली जमीन ज्याच्या त्याच्या नावावर करण्यासाठी नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कात ‘सलोखा योजने’अंतर्गत सवलत देण्यात येत आहे.  

नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क किती आकारले जाईल?

आता सलोखा योजनेअंतर्गत अदलाबदल झालेली जमीन आपापल्या नावावर करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येत आहे. तर मुद्रांक शुल्कासाठी 1 हजार रुपये तर नोंदणी फीसाठी 100 रुपये आकारले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल. तसेच न्यायालयातील अनेक प्रकरणे निकाली ही लागतील.  त्याचबरोबर भूमाफियांचा अनावश्यक हस्तक्षेप देखील होणार नाही. या योजनेमागची भूमिका स्पष्ट करताना सरकारने असे म्हटले आहे.

जाणून घ्या – मुख्यमंत्री वयोश्री योजनें तर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार

सलोखा योजने चा किती शेतकऱ्यांना लाभ होणार?  

आता आपण सलोखा योजनेचा महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना लाभ होईल याची माहिती जाणून घेऊयात. तर महाराष्ट्रातील जमीनधारक शेतकऱ्यांची खातेसंख्या जवळपास 3 कोटी 37 लाख 88 हजार 253 इतकी आहे.  एकूण वहिवाटदार शेतकरी जवळपास 1 कोटी 52 लाख एवढे आहेत. तसेच शेतजमिनीच्या ताब्याबाबत एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या साधारणपणे 13 लाख 28 हजार 340 एवढी आहे. एकंदरीत शेतजमिनीच्या ताब्याबाबत 13 लाखांहून अधिक शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू आहेत.

ही परिस्थिती पाहता सरकारद्वारे ही योजना सुरू करण्यात आली असून, सरकारला या शेतकऱ्यांचे वाद लवकरच सुटतील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर वादात असलेल्या जमिनीबाबत शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर केवळ 15 दिवसांत तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी पंचनामे करणे आवश्यक आहे, असेही सरकारने म्हटले आहे.

सलोखा योजने साठी अर्ज आणि अटी शर्ती काय आहेत?

  • सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी एका शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या शेतकऱ्याकडे तर दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षे असली पाहिजे.  
  • सलोखा योजना ही फक्त शेत जमिनीसाठी लागू राहणार आहे.
  • सलोखा योजनेत तलाठ्याकडे पंचनाम्यासाठी साध्या कागदावर देखील अर्ज करता येणार आहे.   
  • तलाठ्याला अर्ज करताना शेतकऱ्यांचे सर्व्हे नंबर व चतु:सीमा गट नंबरचा उल्लेख करणे आवश्यक आहे. 
  • सलोखा योजनेत जमिनीच्या पंचनाम्याच्या वेळेस किमान 2 सज्ञान व्यक्तींची पंचनामा नोंदवहीत सही अनिवार्य आहे. 
  • सलोखा योजनेअंतर्गत दस्ताची नोंदणी करताना दोन्ही गटातील सर्व सहभागी शेतकऱ्यांची दस्त नोंदणीसाठी संमती अनिवार्य आहे. अन्यथा अदलाबदल नोंदणीकृत होणार नाही. 
  • सलोखा योजना पुढील दोन वर्षांसाठी लागू राहणार आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top