मतदार ओळखपत्र बद्दल जाणून घ्या सर्व काही | Voter ID Card

भारतीय संविधानात देशातील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अधिकार देण्यात आले आहे. यापैकीच एक अधिकार म्हणजे मतदानाचा. भारतील प्रत्येक व्यक्ती वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला मतदानाचा हक्क दिला जातो. पण हे मतदान करण्यासाठी व्यक्तीला ‘मतदार ओळखपत्र’ काढण्याची आवश्यक असते. जर तुमची वयाची 18 वर्षे पूर्ण असतील तर तुम्ही मतदार ओळखपत्र काढण्यासाठी पात्र ठरता. आज आपण मतदार ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने कसे काढता येते, याबाबत सविस्तर माहिती आणि प्रक्रिया जाणून घेणार आहोत. 

मतदार ओळखपत्र म्हणजे काय?  

सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात मतदार ओळखपत्र म्हणजे काय? तर मतदार ओळखपत्र म्हणजे निवडणूक आयोगाद्वारे मतदानासाठी जारी केले छायाचित्र ओळखपत्र असते. आता या मतदान ओळखपत्राचा पहिला वापर म्हणजे मतदार आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून ते दाखवू शकतात. तसेच कार्यक्षमता वाढवणे आणि मुक्त व निष्पक्ष लोकशाही निवडणुकीदरम्यान फसवणूकीला प्रतिबंध करणे  हा आहे. 

मतदानासाठी अर्ज कसा करावा? 

‘मतदान ओळखपत्र’ काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जही करू शकता. तर आपण ऑनलाईन पद्धतीने ‘मतदान ओळखपत्र’ कसे काढायचे हे पाहुयात. 

मतदान ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हाला जर मतदान ओळखपत्र काढायचे असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागेल. तुम्ही जिथे राहत असाल तो पत्ता द्यावा लागेल. त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो द्यावा लागेल. एकदा या सर्व कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करूनच ही कागदपत्रे मतदान ओळखपत्र काढताना द्यावी. 

ऑनलाइन मतदान ओळखपत्र कसे काढावे? 

  • स्टेप 1: तुम्हाला सर्वप्रथम https://voters.eci.gov.in/ या मतदार सेवा पोर्टलवर जावे लागेल.  
  • स्टेप 2: यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. होमपेजच्या वरच्या बाजूला तुम्हाला साइन अप असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.  
  • स्टेप 3: साइन अप ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे विचारलेली माहिती व्यवस्थित भरा आणि पोर्टलवर नोंदणी करा.  
  • स्टेप 4: लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर तसेच पासवर्ड कॅप्चा कोड आणि ओटीपी प्रविष्ट करा. यानंतर मतदार सेवा पोर्टलवर लॉग इन करा. 
  • स्टेप 5: ‘सामान्य मतदारांसाठी नवीन नोंदणी’ या टॅबवरील ‘फॉर्म 6 भरा’ आणि बटणावर क्लिक करा.
  • स्टेप 6: ‘फॉर्म 6′ वर सर्व तपशील व्यवस्थित भरा, तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. म्हणजेच तुमचा ऑनलाईन अर्ज सबमिट होईल.

Leave a comment