No Cost EMI Meaning in Marathi | जाणून घ्या No Cost EMI

No Cost EMI Meaning in Marathi – तर मित्रांनो आपल्याला नेहमीच एक प्रश्न पडतो जेव्हा जेव्हा आपण ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा वेबसाईटवर काही खरेदी करायला गेलो तर तिथे आपण एक ऑप्शन बघतो तो म्हणजे NO COST EMI चा. 

No Cost EMI Meaning in Marathi

NO COST EMI म्हणजे थोडक्यात वस्तूची जी किंमत आहे तीच किंमत आपल्याला भरावी लागते पण ती म्हणजे अनेक हप्त्यांमध्ये जे एका सामान्य माणसासाठी खूप सोयीस्कर असते. पण आपल्याला त्यासोबत हा प्रश्न पण पडत असेल नेहमी की आपल्याला तर तेवढीच किंमत भरावी लागत आहे अनेक हप्त्यांमध्ये ,कुठल्याही प्रकारचा व्याज नाही, मग या कंपन्यांना याचा फायदा काय? हे पैसे कसे कमावतात? मग ते सेलर असेल मॅन्युफॅक्चरर असेल किंवा बँक असेल ही उत्सुकता आपल्याला नेहमीच लागून असते तर आपण जाणून घेऊ की NO COST EMI कसे काम करते.

यासाठी आपण एक उदाहरण घेऊ.

समजा चिंटू एक मोबाईल फोन घेत असेल ऑनलाईन फ्लिपकार्ट वर त्याची किंमत आहे १२,००० रुपये . आणि त्यावर ऑफर आहे NO COST EMI ची. तर बारा महिन्याचे 12000 म्हणजेच दर महिन्याला होणार १,००० .

मग चिंटूला तर तेवढेच रुपये द्यावे लागले? 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

तर यामध्ये होता असं की फ्लिपकार्ट समजा दिवसाला १० फोन विकत असेल आणि फ्लिपकार्ट ला एका फोन मागे २,००० रुपये नफा मिळत असेल. तर दहा फोन मागे झाले २०,००० 

पण आता एक बँक येते फ्लिपकार्ट जवळ आणि त्यांना सांगते की तुम्ही २०,००० दहा फोन मागे कमवत आहात . तर हाच नफा जर तुमचा दुप्पट झाला तर? ते म्हणजे असे की जर दहा फोन्सच्या ऐवजी जर आपण 40 विकले तर नफा ८०,००० होईल. पण तुम्ही तुमचे मार्जिन २,००० ऐवजी १००० करा आणि १००० आम्हाला कमिशनच्या रूपांतर द्या,आम्ही तुमच्यासाठी कस्टमर आणू.

म्हणजेच 40 फोन मागे ४०,००० FLIPKART चा फायदा. यामध्ये बँकेला सुद्धा फायदा 40 हजार रुपयाचा. कस्टमरला NO COST EMI चा ऑप्शन देते म्हणून कस्टमरचा सुद्धा फायदा, ज्यामुळे कस्टमर साठी हे खूप सोयीस्कर होते की कस्टमरला एकदम रक्कम द्यावे नाही लागत आणि कमी पैसे असताना सुद्धा तेवढ्याच किमतीत ती वस्तू सुद्धा विकत घेता येते त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमर ती वस्तू लवकरात लवकर विकत घेतात त्यामुळे मॅन्युफॅक्चरर्स यांचा सुद्धा फायदा.

पण यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की NO COST EMI ही जास्त करून अशा वस्तूंवर दिली जाते की ज्यांना थोडीशी डिमांड ही कमी असेल किंवा ज्याची विक्री ही कमी होत असेल. 

NO COST EMI वर वस्तू घेताना EMI ची अमाऊंट नेहमी कॅल्क्युलेट केली पाहिजे की बारा महिन्यानुसार ती अमाऊंट जी MRP आहे, किंवा डिस्काउंटेड प्राईस जी आहे त्याला मॅच होत आहे की नाही.

नो कॉस्ट ईएमआयद्वारे कंपन्या पैसे कसे कमावतात? जरी ग्राहकांसाठी नो कॉस्ट ईएमआय हा एक मोठा सौदा वाटत असला, तरी ईएमआय पर्याय निवडल्यास व्यवसाय उत्पादनासाठी अधिक शुल्क आकारून पैसे कमावतात. अशा प्रकारे, ते ग्राहकांना दिलेल्या कर्जावरील व्याज परत मिळवू शकतात. कंपन्यांना त्यांच्या ईएमआय योजनांचा प्रचार करण्यासाठी बँकांकडून पैसे देखील मिळू शकतात, ज्यामुळे त्यांच्या नफ्यात भर पडते.

एकंदरीत, नो कॉस्ट ईएमआय ग्राहक आणि व्यवसाय या दोघांसाठीही चांगला आहे. हे ग्राहकांना आगाऊ खर्चाची चिंता न करता वस्तू खरेदी करू देते आणि व्यवसायांना विक्री आणि उत्पन्न वाढवण्याचा मार्ग देते.

शेवटी, लोकांनी नो कॉस्ट ईएमआय योजना निवडण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक बाबींचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, कारण वेळेवर पैसे न भरल्यास त्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात आणि त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तथापि, लोकांनी जर त्यांचा हुशारीने वापर केला तर दिवाळखोर न होता मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआय हा एक उपयुक्त आणि स्वस्त मार्ग असू शकतो. अखेरीस, नो कॉस्ट ईएमआय योजना आणखी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे कारण अधिक व्यवसाय आणि लोकांना ते किती उपयुक्त आहेत हे समजते.

1 thought on “No Cost EMI Meaning in Marathi | जाणून घ्या No Cost EMI”

  1. Pingback: Flat Interest वर Loan घ्यायचे की Reducing Interest वर? अर्थ आणि फायदे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top