FLAT Interest Vs REDUCING Interest ? पुढच्या वेळेस Loan घेताना हे 2 प्रश्न नक्की विचारा. जाणून घ्या काय आहेत फायदे-तोटे?

तर मित्रांनो आपण कधी ना कधी LOAN घेतले असेल किंवा आपल्या ओळखीत कोणी ना कोणी तर नक्कीच घेतले असेल आणि जर का नसेल आपण कधी अनुभव केलेला तर आता घाबरायची गरज नाही कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे लोन वरती लागणारा व्याज. याची माहिती आपण घेऊ की कोणत्या प्रकारचा व्याज हा आपल्यासाठी फायद्याचा आहे आणि कोणत्या प्रकारचा व्याज आपल्यासाठी तोट्याचा आहे.

तर आपण कुठली लोन घेत असतो तर त्यामध्ये दोन प्रकारचे व्याज असतात म्हणजेच interest असतात.

FLAT Interest Vs REDUCING Interest ?

1. Flat interest.

त्याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊ

समजा चिंटू ने ५,००,००० चे लोन घेतले आणि त्याला व्याज पडणार असेल १२% वर्षाला 

म्हणजेच 60 हजार रुपये.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

आपण जो EMI भरत असतो हा मुद्दल अमाऊंट आणि व्याज एकत्रित करून भरत असतो म्हणजेच

५,००,००० ही झाली मुद्दल

६०,००० हे झाले व्याज

५,६०,००० ही झाली एकूण देण्याची रक्कम.

तर बारा महिन्यांप्रमाणे दरमहा हप्ता आपल्याला पडणार 

५,६०,०००/१२ = ४६,६६६

हे झाले उदाहरण फ्लॅट इंटरेस्ट चे. 

2. Reducing interest

आता पण सेमच उदाहरण घेऊ पण reducing interest नुसार.

समजा चिंटू ने ५,००,००० रुपयाच loan घेतले 12% नुसार एक वर्षासाठी. तर आता मात्र हा interest साठ हजार रुपये नसणार कारण व्याज हा सुरुवातीच्या घेतलेल्या रकमेवर नाही म्हणजे ५,००,००० वर नाही तर राहिलेल्या रकमेवर लागणार म्हणजेच पहिला हप्ता भरल्यावर त्यामध्ये काही प्रमाणात मुद्दल आणि काही प्रमाणात व्याज असे कट होते आता पुढच्या महिन्यामध्ये जी राहिलेली मुद्दल असेल त्यावरच व्याज लागणार. पूर्ण ५,००,००० वर नाही. Flat interest च्या केस मध्ये आपल्याला दरमहा समान व्याज लागत होता तो म्हणजे ओपनिंग अमाऊंट ५,००,००० वर. 

Emi – ४४,४२४

Interest – ३३,०९३

Total – ५,३३,०९३

तुम्ही हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी reducing interest calculator चा सुद्धा वापर करू शकता.

https://themunim.com/calculators/reducing-interest-rate-calculator/

त्यामुळे आता कधी तुम्ही loan घेताना बँकेला हे विचारू शकता की जो interest बँक तुम्हाला लावत आहे तो flat interest आहे का reducing. Reducing interest हा आपल्यासारख्या ग्राहकांसाठी फायद्याचा असतो.

समान राहणारे व्याज दर किंवा कमी होणारे दर यापैकी एक निवडण्यापूर्वी, प्रत्येकाचा कर्जाच्या एकूण खर्चावर कसा परिणाम होईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण मूळ कर्जाच्या रकमेवर व्याज मोजले जाते, त्यामुळे सपाट व्याज म्हणजे व्याज कमी करण्यापेक्षा कर्जाच्या आयुष्यभर अधिक व्याज दिले जाईल. याचा अर्थ असा की जे लोक सपाट व्याजदराने कर्ज घेतात ते कालांतराने अधिक व्याज देऊ शकतात. दुसरीकडे, कमी व्याजदर मिळाल्याने दीर्घकाळासाठी लोकांचे पैसे वाचू शकतात कारण कर्जाची शिल्लक जितकी कमी असेल त्यानुसार व्याज निश्चित केले जाते. शेवटी, प्रत्येक प्रकारच्या व्याजाच्या अटी आणि शर्तींचा काळजीपूर्वक विचार करणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळणारी निवड करू शकाल.

तुम्ही तुमच्या कर्जासाठी योग्य प्रकारचे व्याज निवडल्यास दीर्घकाळासाठी तुम्ही भरपूर पैसे वाचवू शकता. कर्जाचा कालावधी, तुमचे आर्थिक व्यवहार आणि नियमित देयके भरण्याची तुमची क्षमता यासारख्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आर्थिक सल्लागाराशी बोलणे देखील तुम्हाला तुमच्या परिस्थितीसाठी सर्वोत्तम पर्याय काय आहे हे शोधण्यात मदत करू शकते. शेवटी, तुमच्या कर्जाच्या अटींबद्दल जाणून घेणे आणि त्यावर कारवाई करणे तुम्हाला भरपूर पैसे वाचवू शकते आणि तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे अधिक वेगाने गाठण्यात मदत करू शकते.

Read More –

NO COST EMI कसे काम करते हे माहीत आहे का ?

5 thoughts on “FLAT Interest Vs REDUCING Interest ? पुढच्या वेळेस Loan घेताना हे 2 प्रश्न नक्की विचारा. जाणून घ्या काय आहेत फायदे-तोटे?”

Leave a comment