बँकेचा आयएफएससी कोड कोणाला सांगणे सुरक्षित असते का? काय असतो आयएफएससी कोड | IFSC Code

बँक खातं आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते. ज्याचं कारण म्हणजे दिवसभरात आपण या बँक खात्यावर खूप काही व्यवहार करत असतो. पैशांची देवाण घेवाण या बँक खात्याच्या माध्यमातून होते. पण अनेकदा आपण एखादी चुकीचं गोष्ट करतो आणि त्यामुळे आपली मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपले बँकमधील पैसे देखील गडप होऊ शकतात. ज्याप्रमाणे आपले बँक डिटेल्स कोणाला देऊ नये, तसेच बँकेचा IFSC कोड देखील कोणाला सांगावा की नाही? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

IFSC Code
IFSC Code

आयएफएससी कोड IFSC code

जर तुमच्या खात्यात कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यावेळी समोरच्या व्यक्तीला तुमचा खाते नंबर आणि आयएफएससी कोड द्यावा लागतो. जसे की तुमची सॅलरी असो किंवा शाळेची स्कॉलरशिप किंवा कोणाकडून तुम्हाला पैसे मिळणार असतील. सर्वात आधी आपण आयएफसी कोड काय काम करतो किंवा त्याचे महत्त्व काय आहे याबद्दल माहिती पाहूयात. 

आयएफएससी कोड का महत्वाचा आहे? Why is IFSC code important? 

आयएफएससी कोड हा बँकेचा कोड असतो. या आयएफसी कोड मुळे बँकेची शाखा कोणती आहे हे समजते. जो भारतातील प्रत्येक बँक शाखेसाठी अद्वितीय आहे. आयएफएससी कोड व्यवहार चोख होण्यासाठी तसेच बँकेची शाखा ओळखण्यासाठी महत्त्वाचा असतो. आयएफएससी कोड मुळे पैसे योग्य बँकेत हस्तांतरित केले जातात. तसेच या व्यवहाराच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी किंवा विलंब आयएफएससी कोड मुळे येत नाही.

IFSC कोड तुमच्या व्यवहारांचा मागोवा घेण्यात आणि त्यांचे निरीक्षण करण्यात मदत करतो. याच आयएफएससी कोडमुळे फसवणूक व व्यवहाराचा गैरवापर होण्याचा धोका कमी होतो. IFSC कोडमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर्थिक व बँकिंग प्रणालीमधील सर्व इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचे निरीक्षण आणि नियमन करू शकते. यामुळे हे बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता व जबाबदारीला प्रोत्साहन देते. तसेच ते ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करते.  

आयएफएससी कोड कोणाला सांगणे सुरक्षित असते का?  Is it safe to share IFSC code with anyone?  

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाहूयात. तो म्हणजे आयएफएससी कोड कोणाला सांगणे सुरक्षित असते का? कारण अनेकदा वेगवेगळ्या बँकेमधून किंवा स्कॅम कॉल मधून तुम्हाला आयएफएससी कोड विचारला जातो. त्यावेळी प्रश्न पडतो की आयएफएससी कोड सांगणे खरंच सुरक्षित असते का? याच प्रश्नाचे उत्तर आता आपण पाहूयात. ज्यावेळी तुमच्या खात्यात कोणाला पैसे पाठवायचे असतील तर त्यावेळी तुमच्या बँकेचा बँकेचे खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड विचारण्यात येतो. खरं तर आयएफएससी कोड मुळे तुमच्या बँकेची शाखा कोणती आहे हे समजते. त्यामुळे कोणाला आयएफएससी कोड सांगितल्यामुळे तुमच्या बँक खात्यातील पैसे कोणीही काढू शकत नाही.  

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

परंतु महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह ठिकाणीच तुम्ही तुमचा बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड सांगावा. अनेकदा कोठूनही स्कॅम्स कॉल येतात आणि त्यावेळी तुम्ही तुमचा बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड सांगाल त्यावेळी मात्र काही नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड वरील नंबर कोणाला सांगाल तर ती व्यक्ती मात्र तुमच्या खात्यातील पैसे काढू शकतो. यामुळे तुमच्या वैयक्तिक बँक खात्याची माहिती कोणाला सांगू नये.

जाणून घ्या – जेष्ठ नागरिकांना ‘या’ 5 योजनेंतर्गत मिळणार दरमहा 1500 रुपये, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया अन् कागदपत्रे 

IFSC कोड कसा शोधायचा? How to Find IFSC Code?

तुम्हाला IFSC कोड कसा शोधायचा असा प्रश्न पडत असल्यास, बँकेच्या शाखेसाठी IFSC शोधायचा हे पाहुयात. 

  • लीफ तपासा

सर्वात पहिला पर्याय IFSC कोड सहसा चेक पानाच्या वरच्या डाव्या कोपर्यात शाखेच्या पत्त्याच्या शेवटी छापला जातो. तेथे तुम्ही आयएफएससी कोड पाहू शकता.

  • बँक खाते पासबुक

तसेच तुम्ही तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्याच पानावर IFSC सह खाते आणि शाखा तपशील पाहा शकता. हे सहसा समोरच्या शीटच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये छापण्यात येतो.  

  • आरबीआय वेबसाइट

तसेच आरबीआयच्या वेबसाइटवर ‘IFSC‘ साठी एक टॅब देण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्ही बँकेचे किंवा शाखेचे नाव टाकून IFSC कोड सहजपणे शोधू शकता.  

Leave a comment