घर बांधायचंय पण हातात पैसा नाही? ‘होम लोन’साठी लगेच करा अप्लाय, पाहा आवश्यक कागदपत्रे अन् व्याजदर | Home Loan

प्रत्येक जण आयुष्यात काही ना काही करण्यासाठी काबाडकष्ट करत असतो. तसेच आपल्या डोक्यावर हक्काचा छप्पर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही लागतो. सध्या तर मोठमोठ्या बिल्डिंगचा जणू काही ट्रेंड सुरू आहे त्यामुळे छोटे घरे बांधण्यात लोकांना रस नाही. आता घर बांधण्यासाठी कर्ज मिळत आहे, ज्याला आपण होम लोन असे म्हणतो.

पण होम लोन (Home Loan) घेण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे? तसेच कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? त्याचबरोबर व्याजदर कसा असतो? याची सर्व माहिती सर्वप्रथम जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग आज आपण ही सर्व माहिती पाहुयात.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now
Home Loan
Home Loan

होम लोन कोणाला मिळू शकते? Who Can Get Home Loan? 

आता सर्वप्रथम होम लोन कोणाला मिळू शकते हे पाहूयात. तुम्ही एकटेही गृह कर्ज घेऊ शकता आणि पती पत्नी दोघेही गृह कर्ज घेऊ शकतात. ज्यावेळी तुम्ही दोघांच्या नावावर कर्जासाठी अर्ज करता, त्यावेळी सह अर्जदाराचा पगारमुळ कर्जदाराच्या पगाराशी जोडला जातो. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम वाढते.

त्याचबरोबर सहज अर्जदार महिलेच्या नावावर मालमत्ता असेल तर स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत मिळते. तसेच काही बँका गृह कर्जत महिलांना विशेष सवलत देखील देतात.

तुम्हाला होम लोन किती मिळू शकते? How Much Home Loan Can You Get? 

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की होम लोन नेमकं किती मिळत. तुम्हाला मिळणार होम लोन हे तुमच्या पगारावर अवलंबून असतं. म्हणजेच तुम्हाला मिळणाऱ्या पगारातून 50 टक्के रक्कम ही गृह कर्जाच्या हप्त्यासाठी बँक घेते. यानुसार तुम्हाला कर्ज किती द्यायचे हे बँक ठरवते. म्हणजेच तुमचं उत्पन्न जितकं जास्त तितकी कर्जाची रक्कम जास्त असते.

जर तुम्हाला कर्ज आणि त्यावर लागणारे व्याजदर तसेच कर्जाचा हप्ता याबाबत माहिती हवी असेल तर तुम्ही ऑनलाइन स्वरूपात कॅल्क्युलेटर करू शकता. कारण वेगवेगळ्या बँकांनी त्यांच्या वेबसाईटवर ग्राहकांसाठी हे कॅल्क्युलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत. 

होम लोन घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा? What to consider while taking home loan? 

आता होम लोन घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला काही गोष्टींचा विचार काळजीपूर्वक करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला होम लोन घेतल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. सर्वप्रथम तुम्ही योग्य बँकेची निवड केली पाहिजे. म्हणजे कोणती बँक किती कर्ज देते तसेच त्यावर किती व्याजदर आकारते याचा अभ्यास केला पाहिजे.

घर घेण्यावेळी बँक तुम्हाला 80 ते 85 टक्के रक्कमेचं कर्ज व्याजाने देत असते. उरलेली रक्कम तुम्हाला भरावी लागते, ज्याला डाऊन पेमेंट असं म्हणतात. त्याचबरोबर तुम्हाला घर घेताना स्टँप ड्यूटी, रजिस्ट्रेशन, बँकेची फी, जीएसटी, अशा इतर गोष्टींकरता खर्च करावा लागतो. ज्यावेळी तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करता, त्यावेळी तुम्हाला आर्थिक नियोजनामुळे कर्ज घेणे सोपे जाईल.

इएमआय म्हणजे काय? What is EMI? 

आपण असं एकदा ऐकतो की मला इएमआय भरायचा आहे. पण हा इएमआय काय असतो हे पाहूयात. कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला एक तारीख दिली जाते त्या तारखेला तुम्हाला या कर्जाचा हप्ता भरावा लागतो. ज्याला इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट, म्हणजे EMI असे म्हणतात. ज्यावेळी बँक तुम्हाला कर्ज देत असते त्याचवेळी तुम्हाला कर्जाचा हप्ता किती द्यायचा हे ठरवले जातात. त्याचबरोबर याच हप्त्यातून कर्ज म्हणून घेतलेली मूळ रकम तसेच त्यावरील आकारण्यात आलेले व्याज हे हप्त्यातून बँक तुमच्याकडून फेडून घेते. 

आवश्यक कागदपत्रे

होम लोनसाठी तुम्हाला ओळखपत्र, तुमचा कायमचा पत्ता, वयाचा दाखला, पॅन कार्ड, शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रतेचा दाखला, नोकरीबाबत माहिती, बँक स्टेटमेंट्स, आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

बँक कधी कर्ज देते?

तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून बँक तुम्हाला कर्ज देण्याचे ठरवते. तुमच्यावर आणखी कोणते कर्ज आहे काय हेही बँक तपासते. बँकेच्या कर्जासाठी तुम्ही पात्र असाल तरच बँक कर्ज देण्याचा विचार करते. तसेच तुम्ही जिथे काम करता तिथेही बँकेचे अधिकारी भेट देऊ शकतात आणि तुम्ही खरंच काम करता याची उलट तपासणी करू शकतात. तसेच तुमचा सिबिल स्कोर देखील तपासला जातो. या सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर बँक तुम्हाला किती कर्ज द्यायचे कर्ज फेडीचा कार्यकाळ तसेच कर्जाचा हप्ता आणि व्याजदर निश्चित करते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top