आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड म्हणजे आपल्या ओळखीचा पुरावा आहे. जो सतत अनेक ठिकाणी आपल्याला लागतो. जसे की बँकेत खाते उघडायचे असेल त्यावेळी तुम्हाला आधार कार्ड (Aadhar Card) लागते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड तुम्हाला लागते. त्याचबरोबर शिक्षणासाठी देखील आधार कार्ड लागते. एकंदरीत तुम्हाला सगळ्याच गोष्टींसाठी आधार कार्ड लागते. म्हणूनच ते तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवले पाहिजे. पण अनेकदा आपल्या घाळपणामुळे आधार कार्ड हरवून जाते. तसच कधी आधार कार्डचा नंबर ही लक्षात राहत नाही. अशावेळी काय करावे? काही सुचत नाही. बरोबर ना? तर मग चिंता नसावी. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड हरवल्यास नेमकं काय केलं पाहिजे? याबाबतची सविस्तर माहिती सांगणार आहोत.
Aadhar Card Lost
तुम्हाला माहीतच असेल की, आधार कार्ड काढताना आपल्या बोटांचे ठसे तसेच डोळ्याचे बुबळे स्कॅन केली जातात. त्याचबरोबर नागरिकांचे मोबाईल नंबर लिंक केले जातात. ई-मेल आयडी नोंदणीकृत केला जातो. त्यामुळे आधार कार्ड हरवल्यास चिंता न करता तुम्ही सहज ते मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीद्वारे ते मिळवू शकता.
ऑनलाइन डुप्लिकेट ई-आधार कार्ड कसे मिळवायचे? How to get duplicate e-adhar card online?
आता आपण ऑनलाइन डुप्लिकेट ई-आधार कार्ड कसे मिळवायचे याबद्दल माहिती जाणून घेऊयात. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
स्टेप 1: सर्वप्रथम तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2: यानंतर तुम्हाला ‘आधार क्रमांक (UID)’ किंवा नावनोंदणी क्रमांक (EID) चा पर्याय निवडावा लागेल.
स्टेप 3: तसेच UID सह नोंदणी करा नाव, ईमेल पत्ता व मोबाइल नंबर यासारखी मूलभूत माहिती प्रविष्ट करावी लागेल.
स्टेप 4: स्क्रीनवर प्रदर्शित सुरक्षा कोड टाइप करा लागेल.
स्टेप 5: यानंतर ‘ओटीपी पाठवा’ किंवा ‘एंटर टीओटीपी’ बटणावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 6: तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. OTP एंटर करा व ‘लॉग-इन’ बटणावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 7: ही प्रोसेस एकदा पूर्ण झाल्यावर, तुमचा आधार क्रमांक तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर किंवा मोबाइल क्रमांकावर पाठवण्यात येईल.
स्टेप 8: त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर त्यासंबंधीची माहिती दिसेल.
आधार कार्ड रिप्रिंट कसे करावे?
आता ऑनलाईन पद्धतीने आधार नंबर मिळाल्यानंतर आपण आधार कार्ड पुन्हा प्रिंट कसे करावे याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
स्टेप 1: सर्वात आधी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि ‘ऑर्डर आधार रीप्रिंट’ बटणावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 2: त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक (UID)’ किंवा नाव नोंदणी आयडी (EID)’ निवडण्यास सांगितले जाईल.
स्टेप 3: तुमचा आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी, पूर्ण नाव, पिन कोड, टॅबमध्ये दर्शविल्याप्रमाणे सुरक्षा मजकूर व मोबाइल नंबर तेथे प्रविष्ट करावा लागेल.
स्टेप 4: यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल.
स्टेप 5: तुमच्या मोबाईलवर मिळालेला OTP ‘Received Enter OTP’ टॅबमध्ये एंटर करा आणि ‘Validate id and Generate OTP ‘ बटणावर क्लिक करा.
स्टेप 6: या सर्व प्रोसेस नंतर तुमचा आधार पीडीएफ फाइल म्हणून जनरेट करण्यात येईल.
आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन डुप्लिकेट आधार कार्ड मिळवा
स्टेप 1: जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या व आधार कार्ड सुधारणा फॉर्म भरावा लागेल.
स्टेप 2: तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा नावनोंदणी क्रमांक माहित असल्यास, तुम्ही रजिस्ट्रारला डुप्लिकेट आधार जारी करण्याची विनंती देखील करू शकता.
स्टेप 3: वैकल्पिकरित्या, कार्यकारी तुमचे बायोमेट्रिक्स सत्यापित करेल व डुप्लिकेट आधारसाठी विनंती करेल.
स्टेप 4: तुमच्या विनंतीवर यशस्वीपणे प्रक्रिया केल्यानंतर, तुमचा आधार तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.