सध्या केंद्र सरकार जेष्ठ नागरिकांना सोयी सुविधा देण्याचा खूप विचार करत आहे. यामुळेच केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहे. या योजनांद्वारे नागरिकांना अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आज आपण अशाच काही योजना पाहणार आहोत. ज्याद्वारे जेष्ठ नागरिकांना सरकार आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकारच्या अशा 5 योजना आहेत ज्यातून सरकार जेष्ठ नागरिकांना 1500 रुपये देऊन आर्थिक मदत करत आहे. चला तर मग आपल्या आजी आजोबांना या योजनांचा लाभ देऊया आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Senior Citizen Yojana
1. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वतन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दीड हजार रुपये प्रति महिना निवृत्ती वेतन मिळते. पण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असतात? हे पाहूयात.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता
६५ वर्षांवरील निराधार वृद्ध नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत?
विहीत नमुन्यातील अर्ज
वयाचा दाखला – 65 वर्ष पूर्ण असावीत
किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. (कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.21,000) तसेच BPL नसलेले हवा.
आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला गरजेचा आहे.
अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो
अर्ज कुठे करावा?
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी तुम्ही तहसील कार्यालय, सेतु केंद्र येथे अर्ज करू शकता. अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500/- लाभ मिळेल.
2. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
‘इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना’ अपंग व्यक्तींसाठी सुरू करण्यात आली आहे. तर 18 ते 79 वयोगटातील 80% पेक्षा अधिक अपंगत्व व बहुअपंग असलेले व्यक्ती यासाठी पात्र असणार आहेत. या योजनेअंतर्गत देखील लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये निवृत्ती वेतन मिळेल.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
विहीत नमुन्यातील अर्ज
अपांगत्वचा दाखला आवश्यक आहे.
दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे महत्त्वाचे आहे)
तसेच लभराठी व्यक्ती किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो.
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तहसील कार्यालय, सेतु केंद्र येथे अर्ज करू शकता. त्याचबरोबर सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/ या पोर्टलवर देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
3. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या आधार देण्यासाठी ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळतात.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आवश्यक कागदपत्रे
विहीत नमुन्यातील अर्ज
वयाचा दाखला (40 ते 79 वर्ष)
विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यु दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक आहे.
सदर महीला किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बैंक पासबुक झेरॉक्स आणि रहिवासी दाखला तसेच अर्जदाराचा फोटो आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालय सेतू केंद्र येथे अर्ज करावा लागेल. त्याचबरोबर तुम्ही सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/ या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.
4. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना
65 वर्षांवरील निराधार वृद्ध व्यक्तींसाठी ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
विहीत नमुन्यातील अर्ज
65 वर्षे पूर्ण असलेला वयाचा दाखला
दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे अनिवार्य)
15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आवश्यक आहे.
आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो जोडावा.
अर्ज कुठे करावा?
या योजनेसाठी देखील तहसील कार्यालय, सेतु केंद्र येथे तुम्ही अर्ज करू शकता. तसेच https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता.
5. संजय गांधी निराधार योजना
समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘संजय गांधी निराधार योजना’ सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1500 हजार रुपये मिळतात.
लाभार्थी
विधवा, दिव्यांग, दर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्तर, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीला, 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक यांना या योजनेचा लाभ मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- विहीत नमुन्यातील अर्ज
- वयाचा दाखला किमान 18 से 65 वर्ष
- 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यु दाखला आवश्यक आहे.
- दिव्यांग जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक (किमान 40%)
- दुर्धर आजार प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- दिव्यांग कमाल वाषीक उत्पन्न 50 हजार
- इतर सर्व लाभार्याकरीता कमाल वाक उत्पन्न मर्यादा 21 हजार
- आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बैंक पासबुक शेरीका, रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.