कर्जा चे प्रकार | Loan किती प्रकारचे असतात? व्याजदर किती पडतो?

तर मित्रांनो ज्या लोकांनी लोन घेतले आहे केव्हा घेण्याचा विचार करत आहात किंवा त्याबद्दल माहितीच नाही त्यांच्यासाठी आपण बँकेचे लोन किती प्रकारचे असतात आणि किती कालावधीच्या असतात ते समजून घेऊ.

loan
LOAN

तर लोन ची एक बेसिक डेफिनेशन म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण एखाद्या BANKING INSTITUTION कडून काही पैसे काही कालावधीसाठी घेतो आणि ते हफ्त्यांच्या रूपात त्यांना परत करतो आणि त्यामध्ये व्याज सुद्धा आपण भरत असतो त्याला लोन म्हणतात.

कर्जा चे प्रकार : कालावधीनुसार

1.SHORT TERM : यामध्ये असे असते की एक वर्षा च्या आत मध्ये आपल्याला लोन चे रीपेमेंट करावे लागते.

2.MEDIUM TERM : या प्रकारच्या लोन मध्ये रिपेमेंट चा कालावधी १ वर्ष ते ३ वर्ष असतो.

3.LONG TERM : यामध्ये असे असते की रिपेमेंट चा कालावधी ५ ते २० वर्ष. उदाहरणार्थ कार लोन , होम लोन.

कर्जा चे प्रकार : गरजेनुसार

Personal loan : पर्सनल लोन वरती इंटरेस्ट रेट जास्त असतो. हा इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याजदर 12 ते 18% च्या दरम्यान असतो हे बँकांवर अवलंबून असते. याचा फायदा असा की बँक जास्त डॉक्युमेंट मागत नाही . हे लोन आपल्याला पाच वर्षासाठी पण मिळू शकते

Gold Loan : हे लोन शक्यतो इमर्जन्सी साठी चांगला ऑप्शन असतो यामध्ये आपण सोनं ठेवून त्यावरती पैसे घेत असतो आणि याचा व्याजदर सुद्धा पर्सनल लोन पेक्षा कमी असतो. यामध्ये सोन्याची क्वालिटी बघितली जाते त्यावर ग्राम मागे किती लोन मिळेल हे ठरवले जाते. यामध्ये गोल्ड चाळीस ते साठ टक्के लोन आपल्याला मिळू शकते.

Property Loan : यामध्ये आपण प्रॉपर्टी चे कागद बँकेत ठेवून त्यावरती लोन काढत असतो जास्तीत जास्त 15 वर्ष कालावधीसाठी आपण काढू शकतो. यामध्ये 40 ते 60 टक्के आपल्याला लोन मिळू शकते.

Home loan : जेव्हा आपल्याला घर विकत घ्यायचे असते किंवा बनवायचं असते तर या प्रकार ची लोन कंजूमर घेऊ शकतो यामध्ये 75 ते 85 टक्के लोन टोटल अमाऊंट मिळू शकते मी याचा कालावधी सुद्धा पाच ते वीस वर्ष असतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीज जसे की प्रोसेसिंग फीज ,लीगल फीज अशा विविध फीज लावतात. याला व्याजदर 6 ते 8 टक्के लागू होतो

Education Loan : ज्यांना विदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आहे पण तिथला खर्च हा परवडण्याजोगा नाही तर अशावेळी एज्युकेशन लोन घेतले जाते. बँकेसाठी तर स्टूडेंटचा एज्युकेशन परफॉर्मन्स बघते स्टूडेंट च्या आई वडिलांचे इनकम बघते आणि शिक्षण झाल्यानंतर रिपेमेंट कधीपासून सुरू होईल यावर मग डिसिजन होतो याचा व्याजदर आठ ते दहा टक्के सहसा असतो.

Car Loan : तर एखादं वेहिकल जेव्हा घ्यायचं असते तेव्हा या प्रकारचे लोन घेतले जाते तर हे शक्यतो Flat interest किंवा Floating rate वर घेतले जाते. फ्लॅट इंटरेस्ट च्या बाबतीत जाणून घेण्यासाठी वाचा Flat interest. 

Corporate Loan : जेव्हा मोठमोठे बिजनेस त्यांच्या ऑपरेशन साठी बँकेकडून लोन घेते तर त्याच्या अमाऊंट खूप मोठी असते तर हे कॉर्पोरेट लोन च्या अंतर्गत येते.

Security Loan : तर या प्रकारचे लोन म्हणजे आपण आपले डॉक्युमेंट जसे की Mutual funds, Bond इत्यादी आपण बँकेत ठेवतो तर या सिक्युरिटीज च्या बदल्यात आपल्याला लोन मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top