Blue Chip Stocks Vs Penny Stocks कशामध्ये Invest केले पाहिजे ?

तर आपण कधी ना कधी हे ऐकलं असेल Blue Chip stocks किंवा penny stocks याबद्दल. तर आपण थोडं सविस्तर जाणून घेऊ Blue chip Stocks Vs Penny Stocks आणि काय आपल्यासाठी बेस्ट आहे याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. मार्केटमध्ये वेगवेगळे प्रकारचे स्टॉक्स असतात जसे की ब्लू चिप्, सीकलीकल स्टॉक्स, ग्रोथ स्टॉक्स ,पेनी स्टॉक्स. आपण याच्यामध्येच दोन प्रकार म्हणजे penny stocks आणि Blue chip stocks याबद्दल बोलूया. 

Blue Chip Stocks Vs Penny Stocks

Blue Chip Stocks vs Penny Stocks

Penny Stocks

तर penny stocks हे सहसा असे स्टॉक असतात ज्यांचे मार्केट कॅप खूप छोटे असते कमी असते किंवा असेही स्टॉक्स त्याच्या किमती खूप जास्त कमी म्हणजेच पैसे मध्ये किंवा दोन चार पाच दहा रुपये अशी प्लस मायनस असते. या कंपनी खूप रिस्की असतात काही काही कंपनी चा बिझनेस हा नुकसानीत असतो काही काही कंपनीमध्ये काही फ्रॉड घडलेला असू शकतो किंवा काही कंपन्यांची मॅनेजमेंट व्यवस्थित नसू शकते किंवा काही कंपन्या ह्या खूप लहान किंवा जस्ट स्टार्ट झालेल्या असू शकतात ज्यांना त्यांचा बिजनेस अजून वाढवण्याच्या मार्गावर आहेत. 

Bluechip Stocks

या कंपनी अशा असतात ज्यांचे मार्केटमध्ये नाव झाले आहे ज्यांचा बिझनेस हा खूप मोठ्या स्तराचा आहे किंवा त्यांचे मार्केट कॅप हे खूप जास्त आहे. याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊ.

समजा एक व्यक्ती तुमच्या जवळ आली आणि त्या व्यक्तीने तुम्हाला दहा हजार रुपये मागितले तर तुम्ही काय कराल? त्याला द्याल? 

आपण सगळ्यात आधी सावध होऊ कारण त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्याला काय माहीतच नाही आपण त्याला ओळखतही नाही त्याच्यावरही माहीत नाही आणि कधी आपण त्याचे नाव सुद्धा ऐकले नाही.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

आता दुसऱ्या बाजूस समजा एक अशी व्यक्ती आली तिच्याबद्दल आपल्याला सगळी माहिती आहे व्यवहार माहिती आहेत त्याची फास्ट हिस्ट्री माहिती आहे अशी व्यक्ती जर का आपल्याकडे पैसे मागत असेल आणि आपल्याला त्या व्यक्तीवर विश्वास असेल तर आपण नक्की त्याला पैसे देण्याचा विचार करू.

असेच आहे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा जे पेनी स्टॉक्स असतात त्यांच्यामध्ये गुंतवणूक म्हणजे एका अनोळखी व्यक्तीला पैसे देण्यासारखा आहे कारण ती व्यक्ती त्या पैशाचा कसा वापर करेल काय करेल किंवा फ्रॉड तर करणार नाही ना याचा आपल्याला काहीच ठाम पत्ता नसतो पण त्याच ठिकाणी ब्लूचिप स्टॉक्स हे असे स्टॉक्स ज्याचा पास्ट रेकॉर्ड याची माहिती बिझनेस व्यवसाय त्याच्याबद्दलची सगळीच माहिती आपल्याकडे असते म्हणजे त्याचे एनालिसिस करणे हे सोपे असते ज्याच्या बेसिसवर आपण असा निर्णय घेऊ शकतो

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे खरंतर ऑलरेडी एक रिस्की काम आहे म्हणजे आपण गोल्ड एफ डी ह्याची जी रिटर्न्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षित करतो म्हणून आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करत असतो ही ऑलरेडी जर का आपण रिस्क घेतली आहे तर पेनि स्टॉक किंवा नॅनो कॅप मायक्रो कॅप कंपनीमध्ये गुंतवण आणखी रिस्क का घ्यायची?

जर का आपल्याला चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवून चांगले रिटर्न्स मिळत असतील तर? याची दुसरी बाजू म्हणजे अशी जेव्हा आपण सुरुवातीलाच अशा पेनी स्टॉक्समध्ये गुंतवतो तर जास्त चान्सेस असतात की तिथे नुकसानच होणार तर तिथेच आपल्याला स्टॉक मार्केट बद्दल गैरसमज निर्माण होतात व आपण त्या गोष्टीला घाबरायला लागतो.

यामध्ये आपल्याला थोडसं एनालिसिस चा स्टडी थोडे पेशन्स थोडं करेज थोडा अवेअरनेस याबद्दल जागरूक राहिले पाहिजे म्हणजे आपण एक चांगली गुंतवणूकदार होऊ शकतो.

Reference –

  1. Investopedia – Blue Chips Stocks

Leave a comment