Budget 2024 | देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांचा आजचा सातवा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्राच्या अर्थसंकल्पाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मोदी सरकारचा लोकसभेच्या विजयानंतर पहिला अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने नऊ घोषणा केल्या आहेत. चला तर मग अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा केला आहे हे पाहूयात.
कृषी क्षेत्र
निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी संशोधन करणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या. कृषी क्षेत्रात साठी निर्मला सीतारामन यांनी तब्बल 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जैविक शेतीवर केंद्राचा अधिक फोकस आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ‘पीएम गरीब कल्याण अन्न योजने’ची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा देशातील तब्बल 80 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.
रोजगार
निर्मला सीतारामन यांनी रोजगारावर देखील भर दिली आहे. देशातील रोजगार वाढवण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 वर्षांच्या या बजेटच्या कालावधीत 4.1 कोटी तरुणांना रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय
निर्मला सीतारामन यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी देखील दोन लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीतून आदिवासी समाजाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुरु करण्यात येणार आहे. ही योजना आदिवासीबहुल गावांसाठी असणार आहे. यामुळे तब्बल पाच कोटी आदिवासी लोकांना याचा लाभ मिळणार आहे.
उत्पादन आणि सेवा
आता राज्यांना पंधरा वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोबाईल आणि मोबाईल ॲक्सेसरीज च्या किमती कमी होणार आहेत. तसेच 200 युनिटपर्यंत वीज अगदी मोफत देण्यात येणार आहे.
शहरांचा विकास
शहरांचा विकास करण्यासाठी 100 शहरांमध्ये स्टेट मार्ट के सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरांमधील एक कोटी गरिबाण करता आवास योजना देखील राबवली जाणार आहे.
ऊर्जा संवर्धन
निर्मला सीतारामन यांच्याकडून सूर्यघर योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पायाभूत सुविधा
नागरिकांसाठी पक्के रस्ते जोडले जाणार आहेत. यासाठी तब्बल 26 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी पाटना ते पुर्णिया एक्स्प्रेस-वे, बोधगया-राजगीर-वैशाली-दरबंगा एक्स्प्रेस-वे, बक्सर-बागलपूर एक्स्पेस-वे बांधण्यात येणार आहेत.
नव्या पिढीसाठी सुधारणा
तरुणांना 500 प्रमुख कंपन्यांमध्ये संधी देण्यात येणार आहे. यासाठी तरुणांना पाच हजार रपये प्रति महिना विद्या वेतन देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जामध्ये 3 टक्के सवलत देखील देण्यात येणार आहे.
निर्मला सीतारामन यांनी काय केल्या घोषणा?
• एँजल टॅक्स रद्द करण्यात आला आहे.
• सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क घटवण्यात आले आहे. यामुळे सोने-चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
• निर्मला सीतारामन यांनी घोषणेनंतर मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
• माशांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार आहेत.
• एक्सरे मशीन स्वस्त होणार आहे.
• इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहे.
• कॅन्सरच्या 3 औषधांवरील कस्टम ड्युटी हवटण्यात येणार आहे.
• तसेच चामड्यापासून बनवलेल्या वस्तू देखील स्वस्त होणार आहे.
• त्याचबरोबर लिथियम बॅटरी स्वस्त होणार आहे.
• सौरउर्जा पॅनल स्वस्त होणार आहे.
• 3 लाखांपर्यंत कर लागणार नसून, 3 ते 7 लाखांपर्यंत 5 टक्के कर लागणार आहे. तर 7 ते 10 लाखांपर्यंत 10 टक्के कर लागणार आहे.
• जर तुम्ही टीडीएस नाही भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार नाही.
• टॅक्स संदर्भातील वाद 6 महिन्यांमध्ये मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.