Economy survey 2024: देशभरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली; अर्थसंकल्पात होईल का कर्जमाफीची घोषणा?

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला आणि कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत की नाहीत हे आपल्याला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच कळेल परंतु तत्पुर्वी भारातातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य न केल्यास केंद्रात असलेल्या NDA सरकारला त्याचा मोठा फटका बसू शकतो असे देखील अर्थसंकल्प विश्लेषकांचे मत आहे. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया की भारतातील शेतकरी नेमके कोणत्या कारणासाठी कर्जमाफी मागत आहेत.  Economy survey 2024

शेतीवर पावसाचा लहरीपणाचा होणारा परिणाम

भारतातील सर्वच राज्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. पावसाच्या पाण्यावर करण्यात येणाऱ्या शेतीला पावसाचा लहरीपणा देखील सहन करावा लागतो. जेव्हा गरज असते तेव्हा पाऊस पडत नाही आणि पीक हातातोंडाशी आल्यावर मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे संपूर्ण पीकाचे नुकसान होते. मागील संपूर्ण वर्ष हे असेच पावसाच्या लहरीपणातच गेले, त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे. म्हणूनच यावर्षीच्या अर्थसंल्पामध्ये भारतातील सर्वच शेतकऱ्यांनी एकमताने कर्जमाफीची मागणी केली आहे. Economy survey 2024

महाराष्ट्रात कर्जमाफीच्या मागणीला जोर

महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी तेलंगणाच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांची ३ लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय एक महिन्यात घ्यावा, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. त्याआधीच महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला होता.  लोकसभा निवडणुकीत महायुतीला शेतकरी नाराजीचा फटका बसलाच होता. त्यामुळे महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना घोषणा करून खुश करण्याचा सपाटा लावलाय परंतु सत्य परिस्थीती वेगळीच दिसून येत आहे. विधानसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे. परंतु केवळ घोषणा करून  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गाजर देऊन चालणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी मान्य न करणे या सरकारला विधानसभेत भारी पडू शकते. मागच्या वर्षी दुष्काळानं देशातील बहुतांश भाग होरपाळून निघाला. तर काही भागात अवकाळी, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता घटली आहे. म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करीत आहेत. Economy survey 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top