RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती. सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्वात मोठी मध्यवर्ती बँक आहे. ही बँक भारतातील सरकारी व खाजगी बँकांच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवते. याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत विविध पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.  सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. चला तर मग या लेखाच्या मदतीने जाणून घेऊ या पदभरतीची पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत.RBI Recruitment

RBI Recruitment

किती पदांसाठी RBI मध्ये पदभरती?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून B श्रेणीच्या पदांसाठी  एकूण 94 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक उमेदवार भरती प्रक्रियेसाठी 25 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकणार आहेत. RBI Recruitment

आवश्यक शैक्षणिक पात्रता

अर्जदाराने पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेला आसावा. 60टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना येथे अर्ज करता येणार नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या B श्रेणाच्या पदभरतीसाठीची अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया 16 ऑगस्ट 2024 पर्यंतच असल्याने इच्छूक उमेदवारांनी त्यापूर्वीच भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. RBI Recruitment

येथे करा अर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पदभरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करावा लागणार आहे.  rbi.org.in. या RBI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. या वेबसाईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची संपुर्ण माहिती मिळेल. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

अर्ज करण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे, ही भरती विविध पदांसाठी होत आहे. यामुळे अर्ज करताना आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करायचा आहे हे तपासूनच ऑनलाईन अर्ज करावा. RBI Recruitment

निवड प्रक्रिया अशी असेल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत जाहीर करण्यात आलेल्या या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही तीन पातळ्यांवर होणार आहे.

· लेखी परीक्षा – अर्ज केलेले सर्व उमेदवार लेखी परीक्षा देऊ शकतील. त्यांनी त्यासाठी योग्य ती तयारी करणे देखील महत्त्वाचे आहे.

· कागदपत्र तपासणी- लेखी परीक्षेत उत्तम गुणांनी पास झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी रिझर्व्ह बँकेच्या निरिक्षक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड करणे आवश्यक आहे.

· मुलाखत – कागदपत्रांच्या तपासणीमध्ये जे उमेदवार योग्य ठरतील त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.

Leave a comment