भारतात सध्या कार्स खरेदीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडत असले तरी नवनवीन मॉडेल्सच्या कार्स खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसून येत नाही आहे. आता हेच पहा ना 9 मे 2024 रोजी नवीन स्विफ्ट कार लाँच करण्यात आली होती त्यावेळी या कारची किंमत 6.49 लाख रुपये होती. तसेच टॉप-एंड मॉडेल 9.5 लाख रुपये इतके होते. त्याचवेळी टाटा कंपनीची पंच कार देखील जास्तीत जास्त विक्री होणारी कार 18.949 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. new swift India’s number 1 car
नवीन स्विफ्ट भारतीयांच्या का पसंतीस पडत आहे? जाणून घ्या!
नवीन स्विफ्ट कारी ही आता भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे कारण या कारची विक्री सुरू असतानाच्या पहिल्या महिन्यात सेम मॉडेल्सच्या तब्बल 19,393 गाड्यांची विक्री झाली आहे. या कारच्या पूर्वीच्या मॉडेलप्रमाणेच, नवीन स्विफ्ट AMT आणि मॅन्युअल पर्यायांसह येते आणि खरेदीदार VXI ट्रिमला प्राधान्य देतात आणि AMT देखील खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. new swift India’s number 1 car
नवीन स्विफ्ट कारची कार्यक्षमता
नवीन स्विफ्ट कार चालकाला अर्थातच 25.75 kmpl मायलेजवर जास्त चांगली इंधन कार्यक्षमता देते. ही कार्यक्षमता आधीच्या स्विफ्टपेक्षा नक्कीच तुलनेने जास्त आहे. नवीन स्विफ्टमध्ये नवीन झेड सीरिजचे तीन सिलिंडर इंजिन आहेत जे आधीच्या इंजिनपेक्षा अधिक कार्यक्षम आहेत. new swift India’s number 1 car