आता 1 व्हॉट्सॲप नंबरचे मॅसेज पाहता येणार 4 डिव्हाईसवर | New Feature of WhatsApp

2009 मध्ये व्हॉट्सॲपची सुरुवात झाली आणि जगात संदेशक्रांती झाली असे आपण म्हणू शकतो. याआधी एखादा मॅसेज पाठवायचा तर आपल्यात्यासाठी 30 पैशांपासूनते 5रु. पर्यंत चार्जेस लावले जात होते. जीमेल, याहू च्या काळामध्ये व्हॉट्सॲपने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आणि अगदी कमी वेळातच प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये जागा मिळवली. आज जगभरात व्हॉट्सॲप 100 पेक्षाही जास्त देशांमध्ये वापरले जाते आणि 2 अब्जाहूनही जास्त व्हॉट्सॲपचे वापरकर्ते आहेत. कालानुरूप बदलणाऱ्या या व्हॉट्सॲपने नवीन फिचर लाँच केले आहे, चला तर मग व्हॉट्सॲपच्या या नवीन वैशिष्ट्याची माहिती मिळवूया. how to use 1 WhatsApp account in 4 devices

WhatsApp New Feature
WhatsApp New Feature

व्हॉट्सॲपमध्ये होत गेलेले बदल

व्हॉट्सॲपच्या मदतीने मॅसेज पाठवणे अगदी मोफत शक्य झाले. कधीही, कितीही मॅसेज पाठवणे शक्य होऊ लागले. इतकेच नाही तर कामाच्या डॉक्यूमेंट फाईल्स, फोटो अटॅच करणे सोपे झाले. कालांतराने फोन कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग हे फिचर व्हॉट्सॲपमधे सुरु केले आणि जगभरात व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागली. मोफत आणि वापरासाठी अत्यंत सोपे असलेले हे ॲप अनेकांच्या पसंतीस पडू लागले. त्यानंतर QR कोडच्या मदतीने आपल्या लॅपटॉपमध्ये व्हॉट्सॲप कनेक्ट करुन ऑफिसेसमध्ये काम करण्याची मुफा कार्मचाऱ्यांना मिळू लागली कारण सुरुवातीला खाजगी वापरापुरते मर्यादीत असलेले व्हॉट्सॲप आता ऑफिसेसच्या कामांसाठी सुद्धी अत्यंत गरजेचे ठरु लागले. New feature of WhatsApp

व्हॉट्सॲपचे नवीन फिचर

आतापर्यंत आपण आपले व्हॉट्सॲप QR कोडच्या मदतीने एक वेळी एकाच डिव्हाईसमध्ये सुरु करु शकत होतो. परंतु यापुढे आपण आपला एक व्हॉट्सॲप दोन लॅपटॉप आणि दोन मोबाईलमध्ये सुरु करु शकणार आहोत किंवा कोणत्याही 4 डिव्हाईसमध्ये सुरु ठेवू शकणार आहोत. आहे की नाही गंमत. आपण आपला व्हॉट्सॲप नंबर एकाच वेळी दोन मोबाईलमध्ये किंवा आपल्या कामाच्या लॅपटॉपमध्ये देखील सुरु ठेवू शकणार आहोत. यामुळे खाजगी आणि ऑफिसचे काम करणे सोपे आणि सहज होणार आहे. New feature of WhatsApp

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top