रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील मुख्य भूमिका बजावणारी मध्यवर्ती शासकीय संस्था आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी 1 जानेवारी 1927 मध्ये झाली असून तेव्हापासून ही संस्था भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण आणि दृष्टीक्षेप ठेवण्याचे काम करीत आहे. भारतातील सर्व बँकांच्या संबंधीत योग्य ती नियमावली जाहीर करुन खाजगी आणि शासकीय बँकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याचे काम देखील RBI च्या माध्यमातून होत असते. याचाच एक भाग म्हणून RBIने ATM संदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. ATM card update
RBI ने ATM संबंधिक कोणता नवीन नियम जाहीर केला आहे?
कॅश काढताना तुम्ही ATM मध्ये योग्य ती माहिती भरली आणि तरीही तुमचे पैसे आले नाहीत सोबतच तुमचे पैसे कट झाल्याचा मॅसेज आला तर तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटवर काही दिवसांत जमा होतील असा नवीन निर्णय RBI ने जाहीर केला आहे. खातेदारांचे पैसे त्यांच्या खात्यात परत करण्यासाठी RBI ने बँकेला 5 दिवस दिले आहेत. या नवीन नियमाप्रमाणे सर्वच बँकांनी त्यांच्या ATM मधून योग्य माहिती भरुनही पैसे न आल्यास आणि पैसे कट झाल्याचा मॅसेज ग्राहकांना गेल्यास निर्धारित कालावधीत ग्राहकांच्या खात्यात पैसे परत करणे बंधनकारक आहे तस न केल्यास बँकेने ग्राहकांना दररोज 100 रुपये देणे करावे असेही नवीन नियमावलीत सांगण्यात आले आहे. ATM card update
एटीएम मशीन वापराचे फायदे
Automated Teller Machine असा ATM चा फुलफॉर्म असून या मशीनच्या मदतीने आपण आपल्या खात्यात असलेली कॅश मिळवू शकतो. या एटीएम मशीन मध्ये कोणत्याही बँकेचे डेबीट कार्ड इन्सर्ट करुन आपण झटपट रोख पैसे मिळवू शकतो. ग्राहक ज्या बँकेचे ATM कार्ड वापरत आहेत त्या व्यतिरिक्त एखाद्या ATM मशीनमध्ये पैसे काढल्यास शुल्क भरावे लागते. इतकेच नाही तर आपण आपल्या बँक खात्याचे विवरण किंवा आपल्या आर्थिक व्यवहारांचे मिनी स्टेटमेंट सुद्ध एटीएम मधून मिळवू शकतो. बरेचदा डेबीट कार्ड चोरी करुन कॅश काढण्याचे प्रयत्न केले जातात म्हणूनच एटीएम कार्ड 3 अयशस्वी पिन कोडनंतर लॉक होण्याची देखील सुविधा बँकेच्या माध्यमातून असते. तसेच एटीएम कार्ड चोरीला गेल्यास आपण ततक्षणी बँकेत फोन करुन आपले ATM कार्ड ब्लॉक करु शकतो. ATM card update