व्हॉट्सऍपच्या AI chatbot फिचर्सने घडवली क्रांती, हव्या त्या विषयाची माहिती मिळविणे झाले सोपे | WhatsApp AI chatbot Features

whatsapp ai chatbot

आज जगभरात असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या स्मार्ट फोनमध्ये व्हॉट्सऍप नसेल. व्हॉट्सऍपचे संपूर्ण जगात 2 अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. व्हॉट्सऍप हे आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. 2009 मध्ये सर्वात आधी व्हॉट्सऍपचा वापर करण्यात आला आणि आज 15 वर्षांत व्हॉट्सऍपने त्याच्या वापरकर्त्यांना विविध सुविधा दिल्या आहेत आणि त्याही मोफत. व्हॉट्सऍप कॉलिगं असो किंवा व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉल, मॅसेजेस सोबत मोठ्या डाटा फाईल्स देखील अटॅच करुन व्हॉट्सऍपवर पाठवता येतात. व्हॉट्सऍपने नवी प्रणाली सुरु केली असून त्यामुळे माहिती विश्वास क्रांती निर्माण होणार आहे .

आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधा व्हॉट्सऍप AI chatbot च्या मदतीने

आता व्हॉट्सऍपमधील AI चॅटबॉटचे नव्या फिचरचा वापर करुन आपण आपल्याला हव्या त्या प्रश्नाचे उत्तर किंवा हव्या त्या विषयाची माहिती मिळवू शकणार आहोत. आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सऍप अपडेट केल्यानंतर कोपऱ्याच न्यू चॅट ऑप्शनवर निळ्या जांभळ्या रंगाचे वर्तुळ दिसते. ते वर्तुळ म्हणजेच AI चॅटबॉट आहे, येथे आपण आपल्याला ज्या विषयाची माहिती हवी ती मिळवू शकतो.

AI chatbot सेवा पूर्णपणे मोफत

व्हॉट्सऍपने AI चॅटबॉटचे नवे फिचर सुरु केले आहे ते पूर्ण पणे मोफत आहे. अनेकदा आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी गुगल किंवा तत्सम ब्राऊजर्सचा वापर करावा लागतो. हे ब्राउजर्स ओपन करताना जलद नेटवर्कची गरज असते. तसेच वेबसाईट ओपन करताना एखादा व्हायरस अफेक्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परंतु आता कोणतीही काळजी करायची गरज नाही, व्हॉट्सऍप AI च्या मदतीने आपण आपल्याला हवी ती माहिती चॅटबॉटच्या मदतीने मिळवू शकतो. तेही अगदी मोफत. बदलत्या टेक्नॉलॉजीसोबत नवे बदल समजून घ्या आणि स्वतःला अपग्रेड ठेवा. नवनवीन माहिती आणि नवनवीन विषयांसंदर्भात लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट सोबत जोडले जा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top