आज आर्थिक नियोजनाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपल्या मासिक मिळकतीतील एक हिस्सा बचत करावा जेणेकरुन ते पैसे भविष्यात एखाद्या आर्थिक अडचणीत वापरता येतील. सध्या ही बचत विविध माध्यमांतून केली जाते. एफडी, बचत खाते, आरडी, एसआयपी आणि म्युच्युअल फंड्स. त्यातील म्युच्युअल फंड हा रिस्की असला तरी जास्त परतावा मिळवून देणारा पर्याय आहे. म्हणूनच आज आपण या पर्यायाचे महत्त्वाचे फायदे जाणून घेणार आहोत.
Mutual Fund Benefits
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रित पणे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात आणि मिळालेल्या नफ्याच्या प्रमाणात लोकांना फायदा करुन दिला जातो. शेअर मार्केटमध्ये एकाच कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक न करता विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे समतोल राहतो आणि नफा तोटा झाला तरी गुंतवणूकदारांचे पैसे स्थिर राहतात.
हे आहेत म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूकीचे फायदे
· अगदी छोट्या रकमेपासून म्हणजे 500रुपयांपासून देखील आपण बचत सुरु करु शकतो.
· म्युच्युअल फंड्समधील पैसे आपण गरजेच्या वेळी कधीही काढू शकतो.
· म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूकीचा कालावधी आपण निवड करु शकतो.
· म्युच्युअल फंड्सची ऑनलाईन खरेदी करता येते.
· आपल्या विविध आर्थिक ध्येयांसाठी विविध SIPच्या मदतीने आपण बचत करु शकतो.
· म्युच्युअल फंड्समध्ये जितका कालावधी जास्त तितका अधिक पैसा असा याचा अचूक फंडा आहे.
· म्युच्युअल फंड्समध्ये आपण गुंतवणूक करतो त्यावेळी आपल्याकडून अगदीच कमी प्रक्रिया शुल्क आकारले जाते. हे कोणत्याही वित्तीय संस्थेच्या किंवा बँकेच्या प्रक्रिया शुल्कापेक्षा नक्कीच कमी असते.
बचत ही एक उत्तम सवय आहे. भविष्य सुरक्षित करण्यासाठी आर्थिक बचत करावी. सध्या म्युच्युअल फंड हा त्यासाठीचा उत्तम पर्याय मानला जात आहे. परंतु योग्य आर्थिक नियोजकाच्या सल्ल्यानुसार आणि तुमच्या मिळकतीनुसारच तुम्ही नक्की किती पैसे म्युच्युअल फंड्समध्ये बचत करावे याची खात्री करा आणि मगच तुमचे पैसे गुंतवा.