केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारकडून विविध योजनांमार्फत महिलांना सहाय्य करण्यात येत आहे. नुकतेच आता राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. महायुती सरकारच्या अखेरचा अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. तर ही योजना काय आहे? या योजनेसाठी पात्रता काय आहे? तसेच महिलांना किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ काय आहे?
राज्य सरकारने 2024-2025 च्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना 1 हजार 500 रुपये प्रति महिना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी महिलांना काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्याचबरोबर काही पात्रता निकष देखील पूर्ण करावे लागणार आहे. यानंतर महिलांना 1 हजार 500 रुपये प्रति महिना मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करणे असा आहे. या पैशातून महिला स्वतःच्या वैयक्तिक गरजा स्वतः पूर्ण करू शकतील. हा उद्देश समोर ठेवून राज्य सरकारकडून ही योजना सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सदर योजना राज्यातील आर्थिक दुर्बल महिलांसाठी असल्यामुळे महिलांच्या कुटुंबाचे एकत्रितपणे 2 लाख 50 हजार आर्थिक वार्षिक उत्पन्न असणे अनिवार्य आहे. याहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची कागदपत्रे
आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
बँक
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
कोणत्या महिला असणार पात्र?
अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आणि अनिवार्य आहे.
ज्या महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तसेच लाभ घेणाऱ्या महिलेने वयाची किमान 21 वर्ष पूर्ण केलेली असावीत. तसेच या योजनेसाठी कमाल 60 वर्ष वयाची मर्यादा आहे.
त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते अनिवार्य आहे.
तसेच अर्ज करण्याऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार असावे. याहून अधिक नसावे.
तसेच महिलेने दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
ट्रॅक्टर सोडून कोणतेही चारचाकी वाहन नावावर नसावे.
कधीपर्यंत करावा अर्ज?
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 1 जुलै 2024 पासून 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज करावा लागेल. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा.
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी कुठे करावा अर्ज?
तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र येते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. तसेच तुम्हाला जर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात या योजनेसाठी अर्ज करू शकता.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना जाहीर केल्या पासून महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंद आहे. लाभार्थी महिलांना दर महिना 1500/- शासनाकडून दिले जाणार आहेत. 1 जुलैपासून या योजनेचे अर्ज मागविण्यात आले आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी या योजनेबाबत अजून एक घोषणा केली, त्यामुळे नक्कीच लाभार्थी महिलांची संख्येत वाढ होणार आहे. चला तर मग पाहूया की कोणती नवी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
हे आहेत या योजनेचे नियम?
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना पात्र ठरविण्यासाठी शासनाकडून काही नियम बनविण्यात आले होते. हे नियम पुढीलप्रमाणे.
· अर्जदार महिला महाराष्ट्राची नागरिक असावी.
· अर्जदार महिलेचे वय 21 ते 60 वर्षे असावे.
· अर्जदार महिलेच्या घरात सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेलली व्यक्ती नसावी.
· अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख इतके असावे.
या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना जाहीर केली, आणि आता तर त्यांनी योजनेच्या आधीच्या नियमांमध्ये बदल केला असून ते बदल पुढीलप्रमाणे आहेत.
· वय वर्षे 21 ते 60 वर्षांपर्यंतच्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत अशी सुरुवातीला घोषणा करण्यात आली होती. आणि आता त्यामध्ये बदल करुन लाभार्थी महिलांचे वय 65 पर्यंत करण्यात आले आहे.
· ज्या महिला अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. या अटीमुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु आता ही जमिनीची अट मुख्यमंत्र्यांकडून शिथिल करण्यात आल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.