TATA BSNL DEAL मध्ये झाला 15000 करोड रुपयांचा करार. जाणून घ्या कसा होणार नागरिकांना फायदा

tata bsnl deal

TATA and BSNL Deal: आपण पाहतच आहोत. मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या इंटरनेट सेवेच्या दरात मोठी वाढ केली आहे. अचानक अशा पद्धतीने  टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या दरांमध्ये केलेल्या  वाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. कारण या तीनही कंपन्यांचे इंटरनेट प्लॅन्स दुप्पट तिप्पट रकमेने वाढले आहेत. यासंदर्भाच देशाचे नामवंत उद्योगपती रजनजी टाटा पुढे सरसावले आहेत. आणि शासकीय असलेल्या BSNLकंपनीसोबत करार करुन या कंपनीला नव्याने उभारी देण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. चला तर मग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

ग्राहकांचा BSNL कडे ओढा

इतर कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये आणि इंटरनेट डाटा सुविधेच्या दरांत मोठी वाढ केल्याने आपसुकच ग्राहकांचा ओढा शासकीय टेलिकॉम कंपनी असलेल्या Bharat Sanchar Nigam Limited  या कंपनीकडे वाढला आहे. अनेक ग्राहक त्यांचे जुने सीमकार्ड BSNL सरकारी टेलकॉम कंपनीमध्ये पोर्ट करून घेत आहेत. इतकेच नाही तर सोशल मिडियावर तुमचे सीम कार्ड बीएसएनएलवर पोर्ट करा, असा ट्रेंड देखील सुरु आहे.  असे असतानाच आता टाटा आणि बीएसएनएल यांच्यात एक मोठा करार झाल्याची बातमी समोर येत आहे. TATA and BSNL Deal

जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यचे ध्येय

टाटा कंपनी आणि BSNL या कंन्यांमध्ये एक महत्त्वाचा कराल मागील आठवड्यात झाला आहे.  यांच्यात 15 हजार कोटी रुपयांचा झाला असून या दोन्ही कंपन्या मिळून 4G इंटरनेट सुविधा देणार आहेत. तसेच भारतातील तब्बल 1000 गावांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचवणार आहेत. यामुळे नक्कीच 1000 गांवात इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. आणि याचा फायदा नक्कीच ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे तुम्ही BSNL चे ग्राहक नसाल तर आत्ताच तुमचे सीम कार्ड पोर्ट करुन घ्या आणि शासकीय सेवा उपभोगा. खाजगी कंपन्यांच्या जाहिरातींना बळी पडू नका. TATA and BSNL Deal

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top