Investment Plan for Senior Citizen : वृद्ध व्यक्तींना या गुंतवणूकीचा अधिक फायदा होऊ शकतो. जाणून घ्या अधिक माहिती.

आधीच्या काळात सरकारी नोकरदारांना निवृत्ती वेतन मिळत असे परंतु आता ते मिळत नाही, खाजगी कर्मचाऱ्यांना तर ते कधीच मिळत नव्हते त्यामुळे 60 वर्षे वयोगटातील व्यक्तांना पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या काळात वैद्यकीय कारणांसाठी पैसे लागतात मग अशावेळी झटपट कॅश उपलब्ध होणे गरजेचे असते. मग निवृत्त व्यक्तींनी नेमकी कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करावे जेणेकरुन त्यांनी अधिक आणि गरज असताना फायदा होऊ शकेल हे आजच्या लेखामध्ये जाणून घेऊ. Investment plan for senior citizen

पारंपरिक गुंतवणूकीचे प्रकार अती वेळखाऊ

बरेचदा निवृत्त व्यक्तींनी त्यांची बचत व गुंतवणूक बँकांमधील मुदत ठेवींमध्ये, पीपीएफमध्ये, सोन्यामध्ये किंवा स्थावर मालमत्तेमध्ये, विमायामध्ये, पेन्शन योजनांमध्ये केलेली असते. परंतु जेव्हा एखादी वैद्यकीय गरज भासते तेव्हा यापैकी बऱ्याचशा पर्यायांमधून पैसे लगेच रोख रकमेत बदलणे कठीण असते. त्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. परंतु काळजीचे कारण नाही आज आपल्याला आर्थिक नियोजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याबद्दल पुढे जाणून घेऊया. Investment plan for senior citizen

म्युच्युअल फंड्समधील लिक्विडीटी

म्युच्युअल फंड्स निवृत्त व्यक्तींना सर्वात आवश्यक अशी लिक्विडीटी उपलब्ध करून देतात ज्यामुळे गुंतवणूकीतून तुमचे पैसे काढून घेणे अत्यंत त्यांना सोपे होते इतकेच नाही तर या गुंतवणूक प्रकारात  उत्तम परतावाही मिळतो. निवृत्ती नंतरचे नियोजन करताना  तुम्ही डेब्ट म्युच्युअल फंड्स मध्ये तुमच्या पैशांचा काही भाग गुंतवला पाहीजे आणि सिस्टिमॅटिक विड्रॉ प्लॅन (SWP) चाही विचार केला पाहीजे. त्यांना अशा गुंतवणुकीमधून नियमित मासिक उत्पन्न मिळण्यास मदत होते आणि डेब्ट फंड्स हे इक्विटी फंड्स पेक्षा अधिक सुरक्षित असतात कारण ते बँक, कंपन्या, शासकीय संस्था आणि रोखे बाजार यांमध्ये गुंतवणूक करतात. Investment plan for senior citizen

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top