मोबाईल हरवणे ही काही नवीन गोष्ट नाही. आपला सर्वांचाच कधी ना कधी कुठे ना कुठे मोबाईल हरवला असेल. अशावेळी आपले सर्व कॉन्टॅक्ट्स, फोटोज आणि बरच काही त्या मोबाईल मध्ये असते. ते सर्व आपल्याला गमवावे लागते. आपण लॉगिन केलेले आपले सोशल मिडिया ऍप्स देखील आपल्या मोबाईलमध्ये असतात. ते चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागले तर आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते. मग यावर उपाय म्हणजे आपण आधीच खरबदारी घेणे. मोबाईल हरवल्यानंतर शोधत बसण्यापेक्षा मोबाईल हातात असताना अशी एक सेटिंग करुन ठेवा की ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल सहज मिळवू शकाल. चला तर मग बघू नक्की कोणती आहे ही सेटिंग. How to find a stolen mobile phone
मोबाईल चोरांपासून सावधान
सध्या मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आहे, शहरी भागात गर्दिचा फायदा घेऊन चोर मोबाईल फोन असा गायब करतात की विचारता सोय नाही. अशावेळी मोबाईल चोरीला गेल्यानंतर पोलीस कंप्लेंट करण्यात जितका वेळ जातो त्यापेक्षाही कमी वेळात आपण आपला मोबाईल शोधू शकतो. कसा म्हणून काय विचारताय. पुढील प्रमाणे आम्ही सांगतो.
गुगल मॅप करेल मदत मोबाईल शोधण्यासाठी
मोबाईल हरवण्या आधीच तुम्ही पुढील सेटिंग करुन ठेवा म्हणजे तुम्ही स्वतःच तुमचा मोबाईल शोधून काढू शकाल. पोलीस स्टेशनला चपला घासण्याची गरज लागणार नाही.
· सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मधील गुगल मॅप या ऍप मध्ये जा.
· गुगल मॅप ओपन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा.
· त्यानंतर location sharing पर्यायावर क्लिक करा.
· आणि तुमच्या मोबाईलचे लोकेशन तुमच्या घरातील किमान दोन व्याक्तींच्या मोबाईलवर शेअर करुन ठेवा. तुमच्याकडे अजून एक फोन असेल तर त्या फोनवर शेअर करुन ठेवा.
· तुमचा फोन चोरीस गेल्यास किंवा तुम्ही कुठेतरी विसरलात आणि तुम्हाला तो सापडत नसल्यास तुम्ही ज्या फोनवर तुमच्या फोनची लोकेशन शेअर केली आहे त्याच्या मदतीने तुमचा हरवलेला फोन परत मिळवू शकता.
· तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या गुगल मॅपच्या मदतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल शोधून काढू शकता. How to find a stolen mobile phone