Joy Hydrogen Scooter: 1 लीटर पाण्यात 150 किलोमीटर धावणारी स्कूटर; ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, जाणून घ्या संपुर्ण माहिती

Joy Hydrogen Scooter सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी गोष्ट कमी वेळात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंच पोहोचवणे शक्य होते. त्यामुळे विविध ब्रँडचे दररोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु त्यांतील काही व्हिडिओ असे असतात जे जास्तीत जास्त शेअर केले जातात. त्यामागे वेगळी संकल्पना असते किंवा समाजोपयोगी विचार असतो. अशीच एक वेगळी आणि हटके माहिती घेऊन आज आम्ही आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊ नक्की कोणती आहे ती माहिती ज्यामुळे सोशल मिडियावर हंगामा झाला आहे.

Joy hydrogen scooter
Joy hydrogen scooter

पाण्यावर चालणारी स्कूटर

पेट्रोल, डिझेल, सिएनजी आणि अगदीच काय तर विजेवर चालणारी स्कूटर माहिती आहे परंतु पाण्यावर चालणारी स्कूटर पाहिली आहे का तुम्ही? हो सध्या पाण्यावर चालणाऱ्या स्कूटरचा व्हिडिओ लाखो, करोडोच्या संख्येने व्हायरल होत आहे.  त्या व्हिडिओमध्ये माहिती देणाऱ्या महिलेच्या सांगण्यानुसार त्यांच्या कंपनीने लाँच केलेली स्कूटर 1 लिटर पाण्यात 150 किमी पर्यंत धावू शकते.   ही एक जॉय हायड्रोजन स्कूटर आहे. छोट्या मुलांसाठी खेळण्यातील स्कूटर लाँच करण्यात आली आहे. दिल्ली येथील प्रगती मैदानावर आत्ताच काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये हे जॉय हायड्रोजन स्कूटर प्रदर्शनाला लावण्यात आली होती. Joy Hydrogen Scooter

डिस्टिल्ड वॉटरवर चालणारी जॉय हायड्रोजन स्कूटर

ज्या स्कूटरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या स्कूटरचे डिस्टिल्ड वॉटर हेच इंधन आहे.  डिस्टिल्ड वॉटर हा एक स्वच्छ पाण्याचा  प्रकार आहे. या पायात कोण्तायही प्रकारची भेसळ नसते. हे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम  घरातील नळाचे पाणी गरम केले जाते आणि त्याची बनलेली वाफ साठवून त्याचे पाणी  थंड करुन वापरले जाते. त्यालाच डिस्टील वॉटर असे म्हणतात.

जॉय हायड्रोजन स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतका आहे

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी स्कूटर ही  जॉय ई बाईक आहे, त्यात एक लिटर डिस्टिल्ड वॉटर ओतले असता  हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे होतात. ही स्कूटर 30 ग्रॅम हायड्रोजनपासून सुमारे 55km ची ड्रायव्हिंग रेंज देते. ही एक हाय स्पीड स्कूटर आहे, जी रोडवर 25kmph चा टॉप स्पीड सुद्धा देते. ही स्कूटर चालवण्यासाठी हॅल्मेटची किंवा लायसन्सची गरज नाही. त्यामुळे छोटी मुले सहज ही स्कूटर चालवू शकतील अशी आहे. Joy Hydrogen Scooter

Leave a comment