Budget 2024 Tax Slab तिसऱ्यांना केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अतीरिक्त अर्थसंकल्प मांडला. यावेळच्या अर्थसंकल्पाकडून नोकरदार वर्गाला खूप अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत की, नाहीत हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
टॅक्स स्लॅब बेसिक सूट 5 लाखापर्यंत देण्यात आली आहे
मोदी सरकारच्या 3.0 अर्थसंकल्पामध्ये बेसिक टॅक्स सूट 3 लाखांपर्यंत देण्यात आली आहे. आधी ती 2.5 लाखापर्यंत होती.यामध्ये कोट्यवधी करदात्यांना त्याचा फायदा झाला आहे. 3 लाख ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर 7 लाख ते 10 लाखाच्या उत्पन्नावर 10%कर, 10 लाख ते 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर, 15 लाखाच्या वरील उत्पन्नावर 30% कर आकारण्यात येणार आहे. या वर्षीच्या अर्थसंल्पात बेसिक सूट 3 लाखापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जे 3 लाखापर्यंत कमावत आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. Budget 2024 Tax Slab
अतिरिक्त अर्थसंकल्पात या 9 घटकांवर लक्ष केंद्रीत केले आहे
अतिरिक्त अर्थसंकल्पात पुढील ९ घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 जुलै 2024 रोजी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला होता त्यात देखील पुढील 9 घटकांचा उल्लेख करण्यात आला होता.
१. शेती क्षेत्रातील उत्पादकता
२. रोजगार व कौशल्य विकास
३. मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय
४. उत्पादन व सेवा
५. शहरी विकास
६. उर्जा संरक्षण
७. पायाभूत संरचना
८. संशोधन व विकास
९. नव्या पीढीतील सुधारणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर्षी पर्यंत 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्व प्रथम त्यांनी 2019 मध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर त्या सलग तिनवेळी अर्थमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आल्या. त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे तर काही भागात उत्साह देखील पाहण्यास मिळत आहे. असे म्हटले जाते की, भारतात होणाऱ्या यापुढच्या निवडणूक यावर्षीच्या अर्थसंकल्पावर अवलंबून असतील. काही राज्यांमध्ये पुढील 6 महिन्यात विभानसभेच्या निवडणूका देखील होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र हे राज्य देखील आहे. आणि महाराष्ट्रासारख्या आर्थिक उन्नत राज्याला या अर्थसंकल्पात वेगळे असे काहीच देण्यात आले नसल्याचे तज्ञांचे मत आहे. Budget 2024 Tax Slab