साठेखत आणि खरेदीखत यातील फरक जाणून घ्या

आपण प्रॉपर्टी खरेदी करताना आधी साठेखत व त्यानंतर खरेदीखत तयार करतो.एखादी खरेदी करताना आपण विकणा-या व्यक्तीबरोबर करार करतो. या कराराचे स्वरूप आणि मसुदा वेगवेगळा असू शकतो. तो करार म्हणजे भविष्यात खरेदी करण्याच्या उद्दिष्टाने केलेला करार असू शकेल (साठेखत – agreement for sale) किंवा प्रत्यक्ष खरेदीचा करार (खरेदीखत – sale deed) असू शकेल. या दोन करारांच्या स्वरूपातील फरक लोकांच्या सहज लक्षात येत नाही. दोन्ही एकच समजले जातात, मात्र प्रत्यक्षात तसे नाही.

Sathekhat vs kharedikhat
Sathekhat vs kharedikhat

साठेखत

साठेखत हा एखादी प्रॉपर्टी भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार असतो. संबंधित प्रॉपर्टी खरेदीदाराला कोणत्या अटी आणि शर्तींवर हस्तांतरित होईल ते नमूद केलेले असते. मिळकतीचे विक्री व्यवहार आणि हस्तांतरण या प्रक्रियांचे नियंत्रण करणारा The Transfer of Property Act, 1882 कायदा साठे खताची व्याख्या पुढीलप्रमाणे करतो.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

“साठेखत हा स्थावर प्रॉपर्टीच्या विक्रीचा असा करार आहे ज्या अन्वये दोन पक्षांमध्ये मान्य झालेल्या अटींनुसार एखाद्या मिळकतीचा विक्री व्यवहार होईल. ” कलम ५४  असेही म्हणते की “निव्वळ असा करार झाला म्हणजे संबंधित प्रॉपर्टीवर (खरेदीदाराचा) कसलाही हक्क , बोजा किंवा हितसंबंध निर्माण होत नाही.”

या व्याख्येवरून असे स्पष्ट होते की साठेखत हा एखादी प्रॉपर्टी भविष्यात हस्तांतरित करण्याचे वचन देणारा करार असतो आणि असे हस्तांतरण होण्यासाठी काही अटी आणि शर्तींची पूर्तता व्हावी लागते. म्हणजे, या करारामुळे प्रस्तावित खरेदीदाराला संबंधित प्रॉपर्टीविषयी कसलाही हक्क प्राप्त होत नाही.

साठेखतामुळे एखादी प्रॉपर्टी काही विशिष्ट अटींची पुर्तता केल्यास खरेदी करण्याचा हक्क खरेदीदाराला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे मिळकत विकणा-याला विशिष्ट अटींची पूर्तता केल्यास संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो.

खरेदीखत

जमिनीच्या व्यवहाराच्या वेळी जमीन खरेदीदार आणि विक्रेत्याच्या संमतीने रक्कम निश्चित केली जाते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खरेदीखत करू शकता. खरेदी केल्यानंतर जमिनीची मालकी हस्तांतरित केली जाते. जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणजे खरेदीखत.

तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठीचे साठेखत केले असेल आणि संबंधित प्रॉपर्टीचा ताबाही घेतला असेल तरीही रीतसर खरेदी खत पूर्ण करून त्याची कायद्यानुसार नोंदणी करेपर्यंत (भारतीय नोंदणी कायद्यानुसार – Indian Registration Act, 1908) प्रॉपर्टीची मालकी विक्रेत्यांकडे राहते. यावरून हे स्पष्ट होते कि, स्थावर प्रॉपर्टीची मालकी फक्त खरेदीखताद्वारेच हस्तांतरित होते. जर योग्य ते मुद्रांक शुल्क भरलेले आणि कायद्यानुसार नोंदणी केलेले कागदपत्र पूर्ण झाले नसेल तर खरेदीदाराला अशा स्थावर प्रॉपर्टीविषयीचे कसलेही हक्क मिळत नाहीत अथवा त्याचे हितसंबंध निर्माण होत नाहीत.

ही काळजी घ्यावी

खरेदीखत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणार्‍याने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम पूर्ण करायची असते. जर सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदीखत करू नये. कारण एकदा खरेदीखत झाले की नंतरचा नवीन जमीन मालक हा त्या जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेत असतो. आणि खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो. खरेदीखताची नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक (sub-registrar)  कार्यालयात झाल्यानंतर काही दिवसातच सातबारा नवीन मालकाच्या नावे होतो. त्यामुळे सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदीखत करू नये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top